Cashew Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : ओल्या काजूगराला शेकडा चारशे रुपये दर

Cashew Rate : एकीकडे परिपक्व झालेल्या काजू बीच्या दरासाठी सर्वत्र आंदोलन सुरू असताना ओल्या काजूगराला चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : एकीकडे परिपक्व झालेल्या काजू बीच्या दरासाठी सर्वत्र आंदोलन सुरू असताना ओल्या काजूगराला चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. ओल्या काजूगराला शेकडा चारशे रुपये दर मिळत असून ओल्या काजू बीला आकारानुसार २५० ते ३०० रुपयांचा दर मिळत आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सध्या काजू बीच्या घसरलेल्या दरावरून आंदोलने सुरू आहेत. काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.

परिपक्व झालेल्या काजू बीला सध्या १२६ रुपये दर दिला जात आहे. असे असले तरी ओल्या काजू बीला मात्र चांगला दर बाजारपेठेत मिळत आहे. ओल्या काजूगराला शेकडो ३०० ते ४०० रुपये दर मिळत आहे. तर काजू बीला २५० ते ३०० रुपये दर मिळत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या विविध भागांत आहे.

ओल्या काजूगराला मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध शहरांमध्ये मोठी मागणी आहे. मुंबईमध्ये ओल्या काजूगराला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक काजू उत्पादक आता ओला काजूगर विक्रीवर भर देऊ लागले आहेत.

ओल्या काजू बीतून गर काढण्यासाठी साधारणपणे शेकडा ५० ते ६० रुपये खर्च येतो. त्यामुळे परिपक्व काजू बीपेक्षा ओला काजू विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT