Soybean Webinar  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Webinar : सोयाबीन क्षेत्रातील सुधारणा आणि व्यापारावर वेबिनार

Agricultural Update : सोयाबीन क्षेत्रातील सुधारणा व्यापार तसेच सध्याचे हमीभाव धोरण आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा, सोयाबीनविषयी सरकारचे धोरण याविषयी आज (ता.२४) वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीन क्षेत्रातील सुधारणा व्यापार तसेच सध्याचे हमीभाव धोरण आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा, सोयाबीनविषयी सरकारचे धोरण याविषयी आज (ता.२४) वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 

इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित या वेबिनारमध्ये सोयाबीन प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधी तसेच कृषी संशोधक मार्गदर्शन करणार आहेत.

या वेबिनारमध्ये पतंजली फुड्स-रुची सोयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिव अस्थाना हे खासजी क्षेत्राची सोयाबीन उत्पादकांच्या अर्थकारणातील सहभाग तसेच सोयाबीन मूल्यसाखळीतील घटकांच्या फायदेशीर सहभागातील भुमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तर आयआयएम बॅंगलोरचे प्रा. गोपाल नाईक हे सोयाबीन भावातील स्थिरता आणि सोयाबीन उत्पादनात शेतकरी टिकून राहण्यासाठी उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

व्हॅमनिकाॅम येथील प्राध्यापक संगिता श्राॅफ या सोयाबीन क्षत्रातील सुधारणा आणि व्यापार या विषायावर मार्गदर्शन आहेत. भारतीय कृषिक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रिष्ण बीर चौधरी हे सध्याचे हमीभाव धोरण आणि सोयाबीन उत्पादकांना आधार देण्यातील भुमिका यावर मार्दर्शन करणार आहेत. तसेच स्मार्ट प्रकाल्पाचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर हेही मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी या वेबिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा पोचला २० हजारांवर,हरभरा दबावातच,संत्री आवक कमी,ज्वारीचे दर टिकून

Cold Wave: राज्यातील थंडीत चढ उतार सुरु; थंडीची लाट ओसरल्याने किमान तापमानात वाढ

Agriculture Pumps: कृषिपंपांना कपॅसिटर बसवून रोहित्रे, वीजयंत्रणेची हानी टाळा

APMC Market: सभापतींनी सोडविली डबल एस बारदान्याची कोंडी

Power Supply Issues: विजेच्या कमी दाबामुळे पेड परिसरात शेतकरी त्रस्त

SCROLL FOR NEXT