Soybean Yellow Mosaic
Soybean Yellow Mosaic Agrowon

Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Soybean Disease : यंदाच्या खरिपात पेरणी झालेल्या ५१ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रापैकी २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड आहे. यावर्षी पेरणीनंतर पाऊस सतत सुरू राहिल्याने पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही.
Published on

Akola News : यावर्षी पेरणीपासूनच शेतातील पिकांवर संकटांची मालिका सुरूच आहे. बहुतांश भागात सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. काही भागात सोयाबीनला शेंगा लागल्या असल्यामुळे तरी शेंग परिपक्व होत असताना आता ‘येलो मोझॅक’ मोठ्या प्रमाणात पसरला असल्याने शेंगा परिपक्व होतील याची खात्री उरली नाही.

तर काही भागात करप्याचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यंदाच्या खरिपात पेरणी झालेल्या ५१ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रापैकी २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड आहे.

Soybean Yellow Mosaic
Soybean Yellow Mosaic : सोयाबीन मध्ये वाढतोय पिवळा मोझॅक

यावर्षी पेरणीनंतर पाऊस सतत सुरू राहिल्याने पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही. पेरणीनंतर पावसामुळे शेतकऱ्यांना निंदणी, खुरपणी, खत, फवारणी, डवरणी आदी व्यवस्थापन वेळेवर करणे शक्य झाले नाही.

त्यामुळे पिके प्रभावित झाली. सततच्या पावसानंतर ऐन फुलधारणेच्या अवस्थेत पडलेल्या धुक्यामुळे सोयाबीनचा फुलोरा गळाला. त्यामुळे बहुतांश भागात सोयाबीनला शेंगा लागलेल्या नाहीत.

Soybean Yellow Mosaic
Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

काही भागात सोयाबीनला जेमतेम शेंगा लागलेल्या दिसत असतानाच तेथे येलो मोझॅक या रोगाचे आक्रमण झाले. सोयाबीन पिवळे पडत आहे तर काही भागात करपा या रोगाने सोयाबीनची झाडे सुकत आहेत. सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या घटीची शक्यता आहे.

मी १६ एकरांत सोयाबीनची पेरणी केली आहे. धुके व पावसामुळे फुलगळ झाली. त्यामुळे सोयाबीनला शेंगा कमी प्रमाणात लागलेल्या आहेत. त्या परिपक्व होत असताना हवाई करपा या रोगाने अनेक ठिकाणी झाडे सुकत आहेत, पिवळी पडत आहेत.
- उमेश धरमकर, शेतकरी, दहिगांव, ता. तेल्हारा
मी १२ एकर सोयाबीन पेरलेले आहे. सोयाबीनच्या शेंगा भरत असताना अचानकपणे झाडे पिवळी पडत आहेत. तर काही ठिकाणी सुकली.
- नीलेश नागपुरे, शेतकरी, बेलखेड, ता. तेल्हारा
तालुक्यात काही भागात अधिक कालावधीच्या सोयाबीन वाणामध्ये रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट (हवाई करपा) या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. सुरुवातीला सोयाबीन वाळत जाऊन खाडे पडण्यास सुरुवात होते. अधिक प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पानगळ व शेंगेगळ होऊ शकते. या करप्याच्या प्रतिबंधासाठी बुरशीनाशकाची फवारणी करण्याची शिफारस विद्यापीठ शास्त्रज्ञांनी केली आहे.
- गौरव राऊत, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com