Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production: साखर उत्पादनात ठरणार उत्तर प्रदेशच अव्वल

Sugar Season: यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशच साखर उत्पादनात नंबर वन ठरण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात नाममात्र एक तर तमिळनाडूत सात कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. उत्तर प्रदेशात अजूनही अकरा कारखाने ऊस गाळप करत आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशच साखर उत्पादनात नंबर वन ठरण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात नाममात्र एक तर तमिळनाडूत सात कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. उत्तर प्रदेशात अजूनही अकरा कारखाने ऊस गाळप करत आहेत. एप्रिलअखेर उत्तर प्रदेश ९२ लाख टन साखर उत्पादन करीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. अजून काही कारखाने सुरू असल्याने यात आणखी वाढ होवू शकते.

महाराष्ट्रात या कालावधीत ८१ लाख टन साखर तयार झाली आहे. एकच कारखाना सुरू राहण्याची शक्यता असल्याने उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. कर्नाटक केवळ ४० लाख टन साखर उत्पादित करीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्‍पादनाची तिन्ही राज्ये उत्‍पादनाच्या दृष्टीने मागे पडली आहेत.

गेल्या वर्षी तिन्ही राज्यात उत्‍पादन जादा होते. गेल्या वर्षी या कालावधीत महाराष्ट्र १०८ लाख टन साखर तयार करीत अव्वल स्थानावर होता. त्‍या खालोखाल उत्तर प्रदेशमध्‍येही १०३ लाख टन साखर तयार झाली होती. कर्नाटकात ५१ लाख टन साखर तयार झाली होती. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ही माहिती दिली आहे.

३० एप्रिलअखेर, देशभरातील १९ साखर कारखान्यांमध्ये एकूण २७५८.५७ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे, यातून २५६.९५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत २३ साखर कारखाने कार्यरत होते. ३११५.१२ लाख टन ऊस गाळप झाले होते. यातून १४.६५ लाख टन साखर निर्मिती झाली होती. यंदाच्या हंगामात ५३४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते.

यंदाच्या हंगामात ५३५ कारखाने सुरू झाले. देशातील साखरेच्या पुनर्प्राप्तीचा (रिकव्हरी) दर मागील हंगामापेक्षा कमी आहे. दर ९.३१ टक्के आहे, जो गेल्या हंगामात याच कालावधीत १०.१० टक्के होता. महाराष्ट्रात २०० साखर कारखाने सुरू होते. १९९ कारखाने पूर्ण बंद झाले आहेत. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना हा एकमेव कारखाना सुरू आहे.

एकूण साखर उत्पादन २६१ लाख टनाचा अंदाज

विशेष हंगामातील उत्पादनाचा समावेश केल्यास, अंतिम उत्पादन ४२ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तराखंड यासारख्या इतर राज्यांमधील उत्पादन लक्षात घेता, हंगामाच्या अखेरीस देशातील एकूण साखर उत्पादन २६१ लाख टन होण्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ३२ लाख टन साखर वळवण्याची अपेक्षा आहे. ते गेल्‍या वर्षीपेक्षा ६० लाख टनांपर्यंत कमी असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT