marine Product Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

मासे निर्यात पुढील वर्षी दुप्पट होईल : पीयूष गोयल

भारत पुढील पाच वर्षात १ लाख कोटी रुपयांची मासे निर्यात करेल, असे दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही निर्यात दुप्पट असणार आहे.

टीम ॲग्रोवन

भारत पुढील पाच वर्षात १ लाख कोटी रुपयांची मासे निर्यात (marine Product Export) करेल, असे दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही निर्यात दुप्पट असणार आहे. गेल्यावर्षी ५० हजार कोटीची मासे निर्यात भारताने केली होती. मासेमारी क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळावी म्हणून जगभरातील महत्त्वाच्या देशांशी भारत मासे निर्यातीसाठी करार करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

जगभरातील मोठा समूह समुद्र मासेमारीवर व्यवसाय आणि अन्न या दोन कारणांसाठी अवलंबून आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतातील मासेमारी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले

देशातील केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मासेमारीचा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. या राज्याबरोबरच महाराष्ट्रातही मासेमारी व्यवसाय केला जातो. हवामान बदलाचा परिणाम आणि वाढत्या इंधन दर वाढीचा फटका मासेमारीला बसत असल्याची तक्रार अलीकडेच केरळमधील मासेमारी संघटनांनी केली होती. त्याविरोधात आंदोलनही पुकारण्यात आले होते.

दरम्यान, यूएई आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत भारताने मासेमारी निर्यातीचे करार पूर्ण केले असून पुढील काळात इंग्लंड आणि कॅनडासोबतही मासेमारी निर्यातीचे करार पूर्ण करण्यात येतील त्यातून निर्यातदारांना नवीन संधी उपलब्ध होतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT