Donald Trump Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

US Import Duty: अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्काला स्थगिती

Tariff Suspension: अमेरिकेने भारतीय वस्तू व सेवा यावरील २६ टक्के वाढीव आयातशुल्क ९ जुलैपर्यंत स्थगित केले आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध बळकट होण्यास मदत होणार आहे.

Team Agrowon

New Delhi News: अमेरिकेने आयातशुल्कवाढीबाबत अखेर भारताला मोठा दिलासा दिला असून, भारतीय सेवा आणि उत्पादनांवरील २६ टक्के वाढीव शुल्कास ९ जुलैपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. व्हाइट हाउसकडून आज रात्री याबाबतचा कार्यादेश जारी करण्यात आला.

तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी चीनव्यतिरिक्त अन्य देशांवरील आयातशुल्काला नव्वद दिवसांसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. या देशांवर केवळ दहा टक्के एवढेच वाढीव आयातशुल्क आकारले जाणार होते.

दरम्यान याआधी ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर २६ टक्के एवढे आयातशुल्क आकारले होते. थायलंड आणि व्हिएतनाम यांच्यासारख्या देशांशी तुलना करता हे प्रमाण तुलनेने अधिक होते. दुसरीकडे अनेक चिनी उत्पादनांवर अमेरिकेने आकारलेल्या आयातशुल्काचे प्रमाण हे १४५ टक्क्यांवर गेले आहे. आज रात्री ट्रम्प यांनी त्यामध्ये आणखी वाढ केली. ट्रम्प यांच्या

निर्णयामुळे आशियाई आणि युरोपीय शेअर बाजारांनी आठ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे उद्या (ता. ११) भारतीय शेअर बाजारदेखील तीन ते चार टक्के नफा दाखवून पडझडीपूर्वीच्याच पातळीवर जातील अशी चिन्हे आहेत. ट्रम्प यांच्या बहुचर्चित वाढीव आयातशुल्क अंमलबजावणीची मुदत जवळ आल्यानंतर जगातील सर्व शेअर बाजार तीन ते चार दिवसांत जवळपास आठ ते दहा टक्क्यांपर्यंत घसरले होते.

मात्र काल ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवरील आयात शुल्कास स्थगिती दिली. जगातील सर्वच शेअर बाजारांनी आज त्याचे स्वागत केले. आज भारतीय शेअर बाजार बंद असले तरी आजचे चार कल बघता उद्या निफ्टी ७०० ते ८०० अंशांपर्यंत नफा दाखवीत उघडेल, म्हणजेच सेन्सेक्सदेखील दोन ते अडीच हजार अंश वाढ दाखवीत उघडेल, अशी चिन्हे आहेत.

भारत सरकार हे प्रभावीपणे परिस्थिती हाताळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये याआधीच द्विपक्षीय व्यापार कराराच्या अनुषंगाने वाटाघाटी झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार पाचशे अब्ज डॉलरवर जाऊ शकतो. यामुळे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. याबाबत आमची बोलणी सुरू आहे.
पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT