US-China Relation : चीनच्या आयात शुल्काचा अमेरिकी शेतकऱ्यांना धसका

Reciprocal Tariff : प्रचंड वाढलेले खर्चावर यंदा नियंत्रण आणणे शक्य झाल्यास तोटा भरून निघण्याची किंवा थोडा नफा मिळण्याची आशा त्यांना होती. अमेरिकेच्या शेतीमालासाठी चीन ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.
USA Farmer
USA Farmer Agrowon
Published on
Updated on

Washington News : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील ५७ देशांना आयातशुल्काचा दणका दिला. चीनवर ३४ टक्के एवढे भरभक्कम आयातशुल्क लागू केल्यानंतर चीननेही शुक्रवारी (ता.४) अमेरिकेवर ३४ टक्के आयातशुल्क लावून ‘जशास तसे’ उत्तर दिले. चीनने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर लावलेल्या ३४ टक्के आयातशुल्कामुळे अमेरिकेतील शेतकरी मात्र चिंतेत पडला आहे.

प्रचंड वाढलेले खर्चावर यंदा नियंत्रण आणणे शक्य झाल्यास तोटा भरून निघण्याची किंवा थोडा नफा मिळण्याची आशा त्यांना होती. अमेरिकेच्या शेतीमालासाठी चीन ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. पण आता चीनने लावलेल्या आयातशुल्कामुळे मोठा तोटा होण्याची भीती अमेरिकी शेतकऱ्यांना वाटत आहे. सोयाबीन आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना अधिक काळजी वाटत आहे. कारण या पिकांपैकी किमान निम्मा हिस्सा निर्यात केला जातो आणि चीन हा त्याचा दीर्घकाळापासून सर्वात मोठा खरेदीदार देश आहे.

USA Farmer
India US Trade War: अमेरिकेचे व्यापारयुद्ध : शेतीमाल बाजारातील संधी अन्‌ धोके!

गेल्या वर्षी चीनने अमेरिकी शेतीमालाच्या आयातीवर २४.६५ अब्ज डॉलर्स खर्च केला. अमेरिकेने मका, गोमांस, कोंबडी आणि इतर अनेक पिकांची चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात केली होती. आता चीनने यावर्षीच्या सुरुवातीला लावलेल्या शुल्काव्यतिरिक्त काल सर्व अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के आयातशुल्क लावल्यामुळे ही सर्व उत्पादने चीनमध्ये खूपच महाग होणार आहेत. ट्रम्प यांनी जाहीर आयातशुल्काची घोषणा केल्यानंतर, शेअर बाजाराप्रमाणेच पिकांच्या दरातही घसरण झाली पाहायला मिळाली.

USA Farmer
Trade War: व्यापार युद्धातील संकटे अन् संधी

दरम्यान, चीनच्या या पलटवारावर ट्रम्प यांनी काल टीका केली आहे. ‘‘चीनने चुकीचे पाऊल उचलले आहे. ते घाबरले आहेत. ही एक गोष्ट ते सहन करू शकली नाही,’’ असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडियावर ‘माझी धोरणे कधीही बदलणार नाही. श्रीमंत होण्याची ही एक चांगली वेळ आहे,’ असेही ते म्हणाले आहे. ‘केवळ कमकुवत असलेलेच अपयशी ठरतील,’ असे अन्य एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे.

तर तिसऱ्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी कंपन्यांना अजिबात फरक पडलेला नाही, याकडे लक्ष वेधले. ‘आयातशुल्कामुळे मोठ्या उद्योगांना अजिबात चिंता नाही. कारण त्यांना माहीत आहे की त्यांचे अस्तित्व कायमस्वरूपी राहणार आहे,’ असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.

अनुकूल काळात सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिएकर ५० ते ७५ डॉलर एवढा नफा होऊ शकतो. पण हे वर्ष चांगले नाही. पिकांवर केलेला खर्च भरून निघेल, एवढा दर मिळू शकत नाही. नव्या आयातशुल्कामुळे अनेक शेतकरी शेती व्यवसायातून बाहेर पडतील, अशी चिंता वाटत आहे. माझी जमीन कसणाऱ्या तरुण शेतकऱ्यांवरही ही वेळ येऊ शकेल, अशी भीती आहे.
-टिम डुफॉल्ट, अमेरिकेतील शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com