Donald Trump Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

50 Percent Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जोरदार झटका दिला आहे. भारताच्या शेतीमालासह वस्तु आयातीवर आणखी २५ टक्के आयात शुल्काची घोषणा केली आहे. म्हणजेच भारतावर आता ५० टक्के आयात शुल्क लागू होणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जोरदार झटका दिला आहे. भारताच्या शेतीमालासह वस्तु आयातीवर आणखी २५ टक्के आयात शुल्काची घोषणा केली आहे. म्हणजेच भारतावर आता ५० टक्के आयात शुल्क लागू होणार आहे. नव्याने जाहीर केलेले २५ टक्के आयात शुल्क २१ दिवसांनंतर लागू होणार आहे. रशियाकडून तेल खरेदी बंद करावी आणि अमेरिके्च्या मागण्या मान्य करून व्यापार करार करावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव वाढवत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युध्द थांबविण्यात अमेरिकेला अद्याप यश आले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी हे युध्द थांबविण्याचे उद्दीष्ट जाहीर केले. पण अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. त्यामुळे रशियावर दबाव वाढविण्यासाठी अमेरिका विविध प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने रशियाकडून तेल आणि संरक्षण साधने खरेदी करू नये, यासाठी अमेरिका दबाव वाढवत आहे. भारताने आपले धोरण बदलले नाही तर भारताच्या आयातीवर दंडही लावला जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

भारत रशियाकडून तेल आयात करतो. यातून मिळालेला निधी रशिया युध्दासाठी वापरतो. तसेच भारत रशियातून आयात केलेले तेल पुन्हा बाजारात विकून नफाही कमावतो, यामुळे रशियाच्या आक्रमकतेला आणखी बळ मिळते, असे व्हाॅईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

युक्रेनसोबतचे युध्द थांबविण्यासाठी आजच रशिया आणि अमेरिकेत चर्चा झाली. मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे रशियाकडून तेल घेणाऱ्या भारतावर आणखी २५ टक्के आयातशुल्क लागू केले आहे. म्हणजेच भारताच्या वस्तु आयातीवर अमेरिकेत आता ५० टक्के आयात शुल्क लागू होणार आहे. वाढवलेले आयातशुल्क २१ दिवसांनंतर लागू होणार आहे.

आयातशुल्कातून या वस्तुंना वगळले

अमेरिकेने आधीच आयात शुल्कातून सवलत दिलेल्या स्टील, अॅल्युमिनियम, औषधे तसेच इलेक्ट्रीकल वस्तु या वाढवलेल्या आय़ात शुल्कातून वगळले आहेत. यामुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सर्वात जास्त आयात शुल्क

भारतावर अमेरिकेने आता ५० टक्के आयात शुल्क जाहीर केले. यापैकी २५ टक्के शुल्क ७ ऑगस्टला लागू होईल तर उरलेले २५ टक्के २१ दिवसांनंतर लागू होईल. म्हणजेच अमेरिकेने आता भारतावर ब्राझीलसोबत सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. यानंतर स्वित्झर्लंटवर ३९ टक्के, कॅनडावर ३५ टक्के आणि चीनवर ३० टक्के आयात शुल्क लावले आहे.

अमेरिकेच्या बाजारात भारत स्पर्धेबाहेर?

अमेरिकेच्या बाजारात भारतातून कापड, चमड्याच्या वस्तू, कोळंबी, सोयापेंड, फळे आणि भाजीपाल्याची निर्यात होते. याच वस्तु निर्यात करणारे चीन, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया, कॅनडा, इक्वेडोर, मेक्सिको हे देश आहेत. परंतु या सर्व देशांमध्ये आता भारतावर सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे भारताचा माल अमेरिकेच्या बाजारात महाग होईल आणि निर्यातीला फटका बसेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनला मागणी वाढली; मेथीच्या दरात नरमाई, हळद-पपई स्थिर, लसूण भाव स्थिर

Paus Andaj: उद्यापासून पाऊस सुरु होणार; विदर्भ, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस

Herbal Plant Conservation : औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी पाऊल

Chia Seed : वाशीममधील चियासीड पोहोचले मुख्यमंत्र्यांपर्यंत

SCROLL FOR NEXT