Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Cultivation: राज्यात ३० टक्के क्षेत्रावर हळद लागवडी पूर्ण

Turmeric Farming: राज्यात पंधरा दिवसांपूर्वी मॉन्सूनपूर्व पावसामुळे हळद लागवड खोळंबली होती. गेल्या आठवड्याभरापासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे हळद लागवड सुरू असून अंदाजे ३० टक्के क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: राज्यात पंधरा दिवसांपूर्वी मॉन्सूनपूर्व पावसामुळे हळद लागवड खोळंबली होती. गेल्या आठवड्याभरापासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे हळद लागवड सुरू असून अंदाजे ३० टक्के क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे. जून अखेरपर्यंत हळदीची लागवड पूर्ण होईल, असा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

राज्यातील प्रामुख्याने हिंगोली, वाशीम, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा या जिल्ह्यांत हळदीचे क्षेत्र सर्वाधिक असते. हळद लागवड मे आणि जून महिन्यांत प्रामुख्याने केली जाते. लागवडीसाठी पोषक वातावरण नव्हते. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्यात होणारी लागवड शेतकऱ्यांनी थांबवली.

मे च्या मध्यापासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र संततधार पाऊस झाला. सलग आठ ते दहा दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हळद लागवडीस अडथळा निर्माण झाला. परिणामी हळद लागवड लांबणीवर पडली. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी हळद लागवडीचे नियोजन करू लागला आहे.

सांगली, सातारा, पुणे यासह पट्ट्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळद लागवड सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यापासून मराठवाडा, विदर्भ यासह अन्य जिल्ह्यांत हळद लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत. यंदाच्या हंगामात हळद लागवड करण्यास १५ ते २० दिवस उशिरा सुरुवात झाली आहे. पावसामुळे अजूनही शेतात पाणी साचून आहे. त्यामुळे वाफसा नसल्याने हळद लागवडीसाठी वाफसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या हळदीला पोषक वातावरण आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हळद लागवडीला गती येणार आहे.

राज्यात सन २०२३-२४ मध्ये ८५ हजार १४८ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. गतवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. त्याच उशीरा सुरू झालेला पाऊस या साऱ्यामुळे याचा परिणाम हळद लागवडीवर झाला होता. सन २०२४-२५ मध्ये ७७ हजार ९९२ हेक्टरवर लागवड झाली होती. अर्थात, गतवर्षी ७ हजार हेक्टरने क्षेत्र कमी झाले होते.

गेल्यावर्षी पाऊस लांबणीवर पडला होता. त्यामुळे हळद लागवड कमी झाली होती. यंदा मॉन्सूनपूर्व पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच हवामान विभागाने यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे लागवड वाढीची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातही हळद लागवडीस प्रारंभ झाला आहे. या वर्षी देशभरात हळदीचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे. जूनअखेर देशात किती हेक्टरवर लागवड झाली याचा पहिला प्राथमिक अंदाज समोर येईल.
डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबेडिग्रज, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT