Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : मोझांबिकच्या भांडणात तूर पोचली १० हजारांवर; आफ्रिकेतून होणारी तूर आयात पुन्हा एकदा रखडली

Tur Market Update : मोझांबिकमध्ये दोन कंपन्यांमध्ये भारताला तूर निर्यात करण्यावरून भांडण लागलं. भांडण कोर्टात गेलं. कोर्टाने निकाल दिला आणि निर्यात पुन्हा रखडली.

Anil Jadhao 

Pune News : दरवर्षी आपल्यासाठी डोकेदुखी ठरणारा मोझांबिक यंदा आपल्या तूर उत्पादकांसाठी फायद्याचा ठरतोय. आता हेच बघा ना, मोझांबिकमध्ये दोन कंपन्यांमध्ये भारताला तूर निर्यात करण्यावरून भांडण लागलं. भांडण कोर्टात गेलं. कोर्टाने निकाल दिला आणि निर्यात पुन्हा रखडली. पण या भांडणात आपल्या तुरीच्या भावाला मात्र फोडणी मिळाली. 

मागच्या महिन्यात तुरीचे भाव कमी झाले होते. कारण ऐन आपली नवी तूर बाजारात येण्याच्या काळातच तूर आयात होणार होती. ही तूर येणार होती आफ्रिकेतील मोझांबिकमधून. यामुळे तुरीचे भाव ८ हजारांपर्यंत कमी झाले होते.

पण मोझांबिकमधील या दोन कंपन्यांमध्ये भांडण लागल आणि आपल्या तुरीच भाव वाढले. त्यामुळे मोझांबिकमधील हे भांडण आपल्यासाठी का महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल.

मोझांबिकमध्ये दोन बलाढ्य कंपन्यांमध्ये वाद झाला तो भारताला तूर निर्यात करण्यावरून. त्या कंपन्या आहेत ईटीजी आणि राॅयल ग्रुप. मोझांबिकमधील एका न्यायालयाने राॅयल ग्रुपच्या बाजुने निकाल दिला

आणि इटीजी या कंपनीच्या गोदामांमधील तूर जप्त करून निर्यात करण्याला मंजुरी दिली. न्यायालयाचा आदेश आल्याने राॅयल ग्रुपने तूर जप्त केली आणि भारताला निर्यातीसाठी बंदरांवर नेली. इथपर्यंत सर्व ठिक होतं. 

पण ज्या इटीजी कंपनीची तूर जप्त केली ती कंपनी दुसऱ्या न्यायालयात गेली. या न्यायालयाने आधीच्या न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत ईटीजी कंपनीच्या बाजुने निर्णय दिला. तसेच या या तुरीच्या निर्यातीवरही बंदी घातली.

म्हणजेच माल जप्त करणाऱ्या राॅयल ग्रुपला हा माल पुन्हा मूळ कंपनीला म्हणजेच ईटीजी कंपनीला द्यावा लागला. यामुळे मोझांबिकमधून भारताला होणारी तूर निर्यात पुन्हा एकदा रखडली. 

भावाची पातळी कशी राहू शकते?

मोझांबिकमधील तूर दीड ते दोन लाख टनांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तसेच ही तूर जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत भारतात आली असती, असंही सांगितलं जातं. म्हणजेच आपली नवी तूर आणि त्यातही आयात यामुळे भाव कमी झाले असते.

पण या भांडणामुळं आयात कमी आहे. उत्पादन कमी असल्याने चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकरीही थांबले. त्यामुळे भावात चांगलीच वाढ झाली. सध्या तुरीचा भाव ९ हजार ते ९ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दिसतो. यंदा तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे. कशाचा आहे ते आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेच आहे.

त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रीप्शनमध्ये मिळेल. त्यामुळे शेतकरी यंदा तुरीसाठी किमान १० हजारांचे टार्गेट ठेऊ शकतात. तर मार्चनंतर तुरीच्या भावात आणखी वाढ होऊ शकते, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lakhpati Didi Yojana: ‘लखपती दीदी’ योजनेचा अमरावतीत बोलबाला; महिलांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ

Agriculture Innovation: ‘शेतकरी-शास्त्रज्ञांचा दुवा अधिक मजबूत करणारा उपक्रम’

Local Body Elections: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकांसाठी चुरशीने मतदान

Agrowon Podcast: सरकीचे दर टिकून; सोयाबीनमधील वाढ कायम, कापसात काहीसे चढ उतार, मका भाव दबावातच तर गव्हाचे दर टिकून

Cotton Prices: कापूस दरवाढीचा लाभ अल्प शेतकऱ्यांना

SCROLL FOR NEXT