Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : तुरीचे बाजारभाव स्थिर; कापूस, सोयाबीन आणि कांदा तसेच आल्याचे सध्याचे दर काय आहेत?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, तूर आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनच्या आजही नरमाई आली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.०७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीन ५० रुपयांनी कमी झाले होते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजारात सोयाबीनची खरेदी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सुरु होती. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूसात चढ उतार

कापसाच्या भावात आज पुन्हा चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७० सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमीच राहत आहेत. आज दुपारपर्यंत ६८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कायम होते. तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन ५७ हजार ७०० हजार रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोचली आहे. तरीही कापसाचे भाव  ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

गव्हाच्या भावाला आधार

गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे. सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत. पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो. त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे. यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत. गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून १०० ते १५० रुपयांनी वाढला आहे. सध्या गव्हाचा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

तुरीचा भाव स्थिरावला

तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता. तसेच आयातही सुरु आहे. याचा दबाव दरावर आला. पण भाव १० हजारांच्या दरम्यान राहीले होते. मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. तुरीचा सरासरी भाव १० हजार ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांदा स्थिरावला

कांद्याचा भाव आजही स्थिरावलेला दिसला. नाफेडने बाजारात कांद्याची विक्री सुरु केल्यानंतर कांद्याच्या भावात नरमाई आली होती. मात्र मागील ५ दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिरावला आहे. आजही कांदा मार्केट ३ हजार ५०० ते ३ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. नाफेडने बाजारात कांदा विक्री सुरु केली तरी बाजारावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. कांदा भावात पुढच्या काळात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT