Agrowon Podcast : हरभऱ्यातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत आल्याचे दर?

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, आले, कांदा आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आठवड्याच्या शेवटी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आलेली नरमाई आठवड्याच्या सुरुवातीलाही कायम होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.०३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीन ५० रुपयांनी कमी झाले होते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजारात सोयाबीनची खरेदी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सुरु होती. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला

कापसाच्या भावातील चढ उतार मागील २ दिवसांमध्ये काही प्रमाणात थांबल्याचे दिसत आहे. मात्र भावापतळी नरमलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कायम आहेत. आज दुपारपर्यंत ६८सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कायम होते. तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन ५९ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोचली आहे. तरीही कापसाचे भाव ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agrowon Podcast : तुरीच्या भावात काहीशी वाढ; कापूस, सोयाबीन, मोसंबी, कांद्याचे काय आहेत दर ?

आल्याचे भाव टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Agriculture Market
Agriculture Commodity Market : मका वधारणार; तूर, सोयाबीनमध्ये नरमाई

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढली. हरभऱ्याचा भाव दिल्ली आणि जयपूर सारख्या बाजारात ८ हजारांवर पोचला. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा स्थिरावला

नाफेडने बाजारात कांद्याची विक्री सुरु केल्यानंतर कांद्याच्या भावात नरमाई आली आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिरावला आहे. परंतु आजही उच्चांकी भावापेक्षा मार्केट रेट ४०० ते ६०० रुपयांनी कमी आहे. आजही कांदा मार्केट ३ हजार ४०० ते ३ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नाफेडने बाजारात कांदा विक्री सुरु केली तरी बाजारावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. कांदा भावात पुढच्या काळात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com