Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market: आफ्रिकेतून आयात सुरु होणार; भाव पडतील का?

Tur Market Update : आफ्रिकेतील देशांमध्ये तुरीची काढणी सुरु झाली. भारताला तुरीसाठी आफ्रिकेचा आता आधार आहे.

Team Agrowon

Pune News : आफ्रिकेतील देशांमध्ये तुरीची काढणी सुरु झाली. भारताला तुरीसाठी आफ्रिकेचा आता आधार आहे. नुकतेच केंद्र सरकारने मोझांबिकमधील निर्यातदारांना जास्तीत जास्त तूर भारताला निर्यात करण्याचे आवाहन केले होते.

यंदा आफ्रिकेतून भारताला निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. पण सध्या बाजारातील दर, देशातील तूर पिकाची लागवड आणि पावसाची स्थिती पाहता तुरीच्या भावात फार घट होण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले.

भारतात आयात होणाऱ्या तुरीमध्ये जवळपास ६० टक्के वाटा म्यानमारचा आहे. तर मोझांबिक जवळपास २१ टक्के तूर भारताला पुरवतो. सुदानमधून ११ टक्के, टंझानियातून ४ टक्के आणि मालावीतून ३ टक्के तूर भारतात आयात होते.

विशेष म्हणजे या देशांमध्ये तुरीचा वापर नगण्यच आहे. हे देश केवळ निर्यातीसाठी तूर लागवड करतात. आफ्रिकेतील तूर काढणीला आली. येथील निर्यातदार भारताला पुढील महिन्यापासून निर्यात वाढवतील, असा अंदाज आहे.

मागील हंगामात भारताने जवळपास ९ लाख टन तूर आयात केली होती. यंदा तूर आयात १० लाख टनांवर नेण्याचा सरकारचा उद्देश आहे. पण तुरीचा एव्हढा पुरवठा झाला पाहीजे. आफ्रिकेतील देश किती तूर लगेच निर्यात करतात हेही पाहावे लागेल. कारण भारताला तुरीची टंचाई जाणवते हे निर्यातदारांना माहित आहे.

त्यामुळे निर्यातदार लगेच पुरवठा वाढविण्याची शक्यता कमी असल्यचे जाणकारांनी सांगितले. भारतात तुरीचे दर वाढत असल्याने आफ्रिका आणि म्यानमार या देशांनीही निर्यातीचे भाव वाढवले आहेत. त्यामुले आफ्रिकेतून तूर लगेच बाजारात येऊन भाव कमी पडण्याची शक्यता दिसत नाही.

देशातील तूर लागवड आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा ८ टक्क्यांनी कमी आहे. देशातील लागवड ३७ लाख हेक्टरवर पोचली. तसेच अनेक तूर उत्पादक भागात पावसाचे प्रमाण कमी जास्त आहे. काही भागात पाऊस जास्त झाला. तर काही भागांमध्ये पाऊस अगदी कमी आहे.

त्यातच महत्वाच्या मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी दिसते. पुढील काळातही पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा देशातील तूर उत्पादन गेल्यावर्षीफेक्षाही कमी राहण्याची शक्यता वर्तविली जाते. उत्पादनाचा अंदाज देणे आता घाईचे होईल. पण पिकाची स्थिती पाहून उत्पादन वाढणार नाही, असे जाणकार सांगतात.

सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये भाव मिळतोय. आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीचे भावही ८ हजार ते ९ हजार रुपये आहेत. आफ्रिकेचा बहुतांशी माल कमी गुणवत्तेचा असतो. यामुळे भावही कमी असतात. आफ्रिकेतील तूर आयात वाढण्याचा अंदाज असला तरी देशातील बाजारात दर फार कमी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT