Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Market Update : पुढच्या काही आठवड्यांपासून नव्या तुरीची बाजारात आवक सुरु होईल. नवा माल बाजारात येण्याच्या तोंडावर स्टाॅक लिमिट काढल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

Anil Jadhao 

Pune News : सरकारने तूर आणि हरभऱ्यावर लावलेले स्टाॅक लिमिटम मुदत संपल्याने सध्या लागू नाही. सरकारने जुलै २०२४ मध्ये तूर आणि हरभऱ्यावर ३० सप्टेंबरपर्यंत स्टाॅक लिमिट लावले होते. आता ३० सप्टेंबर संपला. स्टाॅक लिमिटची मुदतवाढविण्यासाठी सरकारने आदेश काढला नाही. त्यामुळे स्टाॅक लिमिट काढल्याचे स्पष्ट होते. पुढच्या काही आठवड्यांपासून नव्या तुरीची बाजारात आवक सुरु होईल. नवा माल बाजारात येण्याच्या तोंडावर स्टाॅक लिमिट काढल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. 

गेले सलग दोन वर्षे देशात तुरीचे उत्पादन घटले होते. त्यामुळे बाजारात पुरवठा कमी होऊन दरात वाढ झाली. विदेशातून तूर आयातीवरही मर्यादा आहेत. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात देशात ७ लाख ७१ हजार टनांची आयात झाली होती. तर चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्टच्या दरम्यान ३.५ लाख टनांची आयात झाल्याचा अंदाज आहे. देशात भाव वाढल्याने आयात मालाचेही भाव वाढले होते. भाव कमी करण्यासाठी सरकारने २१ जुलै २०२४ रोजी तूर तसेच हरभऱ्यावर स्टाॅक लिमिट लावले होते.


गेले सहा ते सात महिने वर्षभर तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. तुरीने १२ हजारांचा टप्पा गाठला होता. यंदा खरिपाची लागवड सुर झाली तेव्हा आपल्या राज्यातील महत्वाची पीकं असेलेल्या कापूस आणि सोयाबीनचे भाव दबावात होते. मात्र तुरीचे भाव तेजीत होते. त्यामुळे देशात तुरीची लागवड वाढली. महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकमध्येही लागवड वाढली आहे. 

देशात यंदा ४६ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली. गेल्या हंगामातील लागवड ४१ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा लागवडीत ६ टक्क्यांची वाढ झाली. तुरीच्या लागवडीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तुरीच्या दरातील तेजीही थांबली होती. त्यातच सरकारनेही दरा नियंत्रणासाठी खुली आयात आणि स्टाक लिमिट लावले होते. परिणामी दरातील तेजी थांबली होती. 

यंदा तुरीची लागवड ६ टक्क्यांनी वाढली. पाऊसमानही चांगले आहे. त्यामुळे देशातील तूर उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. तसेच तुरीच्या किमती स्थिरावल्या आहेत. त्यामुळे सरकारने स्टाॅक लिमिटची मुदत वाढवली नाही, अशी चर्चा बाजारात आहे. 

आगाप लागवड झालेली तूर पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात दाखल व्हायला सुरुवात होईल. या परिस्थितीत स्टाॅक लिमिट कायम राहिल्यास व्यापारी आणि प्रक्रियादारांना काम करण्यात अडचणी येतात. पण आता सरकारने स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळे नवी तूर बाजारात दाखल होण्याच्या काळात बाजार सुरळीत चालेल आणि बाजारावर सरकारचे दडपण नसेल. यामुळे बाजाराला आधारही मिळेल. 

सरकारने यंदा तुरीला ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारात तुरीला १० हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सरकारने स्टाॅक लिमिट काढले तरी तुरीच्या भावात फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. कारण एकतर सरकारचे बाजारावर बारीक लक्ष आहे आणि नवा माल पुढच्या काळात बाजारात दाखल होईल. यामुळेच सरकारने तुरीवरील स्टाॅक लिमिट काढल्याचे सांगितले जात आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT