Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीन, मका, तुरीची लागवड १३ टक्क्यांनी घटली; उत्पादन वाढणार का? 

Agriculture Update : जागतिक बाजाराने आधीच टेन्शन वाढवलेल्या सोयाबीनची लागवड १ टक्क्यांनी वाढली. तर कापसाची लागवड तब्बल ११ टक्क्यांनी कमी झाली.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : खरिपातील पेरण्यांचा जवळपास अंतिम आकडा आता पुढे आला. त्यामुळे खरिप पिकांचे बाजारभाव काय राहतील? याचे आराखडे बांधायला सुरुवात झाली. जागतिक बाजाराने आधीच टेन्शन वाढवलेल्या सोयाबीनची लागवड १ टक्क्यांनी वाढली. तर कापसाची लागवड तब्बल ११ टक्क्यांनी कमी झाली. आपलं तिसरं महत्वाचं पीक असलेल्या तुरीची लागवड १३ टक्क्यांनी वाढली. 

फक्त लागवडीच्या आकड्यांवरून बाजाराची दिशा ठरणार नाही. पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर या पीक वाढीच्या आणि पक्व होण्याच्या काळात पाऊस कसा राहतो? ऑक्टोबरमध्ये सोयाबीन काढणीच्या काळात तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कापूस वेचणीच्या काळात पाऊस नुकसान करतो का? हे देखील उत्पादनावर, मालाच्या गुणवत्तेवर आणि बाजारावर परिणाम करेल. 

Agriculture Market
Soybean Market : उत्पादनवाढीच्या अंदाजाने सोयाबीन बाजार मंदीत

खरिपाच्या पेरणीचा विचार केला तर यंदा आतापर्यंत पेरणीचे क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा जवळपास १.५ टक्क्याने वाढले. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे मागच्या वर्षी देशात पाऊस कमी पडला होता. त्यामुळे अनेक भागात पेरण्याच होऊ शकल्या नाहीत. पण यंदा देशात पाऊस पहिल्या दोन महिन्यांमध्ये सरासरी गाठण्यात यशस्वी ठरला. यामुळे पेरण्या गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसत असल्या तरी सरासरीएवढ्या होण्याची शक्यता आहे. 

यंदाच्या खरिपात कापसाची लागवड सर्वात जास्त प्रमाणात घटली. कापसासोबतच उडीद, बाजरी, रागी, तीळ, एरंडी आणि तागाची लागवड घटलेली दिसते. तर मक्याची लागवड सर्वाधिक ७.५ टक्क्यांनी वाढली. मक्यासोबतच भात, तूर, मूग, भुईमूग आणि सोयाबीनची पेरणी वाढलेली दिसते.

Agriculture Market
Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावातील नरमाई कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच बाजरी दर काय आहेत?

भाताचे क्षेत्र सर्वाधिक ३३१ लाख हेक्टरवर आहे. भाताची लागवड ४.३ टक्क्यांनी वाढली. कडधान्याची लागवड ६.७ टक्क्यांनी वाढून ११७ लाख हेक्टरवर झाली. तर सोयाबीनचा पेरा सुरुवातीच्या काळात खूपच आडीवर होता. पण आता सोयाबीनची लागवड केवळ १ टक्क्याने आघाडीवर असून जवळपास १२५ लाख हेक्टरवर पोचली. मक्याची लागवड ८५ लाख हेक्टरवर झाली असून कापूस ११० लाख हेक्टरवर आहे. 

खरिपाच्या पेरणीची ही आकडेवारी ९ ऑगस्टपर्यंतची आहे. यापुढे खरिपातील लागवडीच्या आकड्यांमध्ये भात वगळता जास्त बदल होण्याची अपेक्षा खूपच आहे. पण एकूणच खरिपाच्या उत्पादनासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पाऊस आणि हवामान खूपच महत्वाचे आहे. आपले महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची काढणी ऑक्टोबरमध्ये होते. नेमकं याच काळात पावसाने पिकाचे नुकसान होते, हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. तसेच कापूस वेचणीच्या काळातही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनेकदा पाऊस होतो. यामुळे उत्पादन कमी होते आणि गुणवत्ता कमी होते. या कारणांमुळे सध्या तरी काही पिकांचा पेरा जास्त दिसत असला तरी पुढील दोन महिन्यातील पिकांची परिस्थिती काय राहते? याकडे बाजाराचे लक्ष असेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com