US-China Trade War Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

US-China Trade War : चीनकडून शिकण्यासारखे बरेच काही

China Import-Export Policy : अमेरिकेची चीनबरोबर आयात-निर्यात व्यापारातील तूट हा डोनाल्ड ट्रम्प यांचा गाभ्याचा मुद्दा. ती तूट कमी करण्यासाठी ते वाटेल त्या थराला जात आहेत.

संजीव चांदोरकर

China's Global Trade Policy : चीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकात दम आणू शकत आहे, कारण त्याने गेली किमान दहा वर्षे अशी काही वेळ येणार याचा अंदाज बांधत त्यासाठीचा गृहपाठ (होमवर्क) केला आहे.

अमेरिकेची चीनबरोबर आयात-निर्यात व्यापारातील तूट हा डोनाल्ड ट्रम्प यांचा गाभ्याचा मुद्दा. ती तूट कमी करण्यासाठी ते वाटेल त्या थराला जात आहेत. पण इतिहासात डोकावले तर असे दिसते, की अमेरिकेची युरोप आणि जपानशी देखील अशी तूट होती; १९६०-७० दशकात युरोपबरोबर आणि १९८०-९० मध्ये जपान बरोबर.

१९७१ मध्ये रिचर्ड निक्सन यांनी डॉलरचा विनिमय दर सोन्यापासून तोडून युरोपला वठणीवर आणले आणि अशाच बिगर आर्थिक क्लृप्त्या वापरून नंतर जपानला. युरोप आणि जपानने अमेरिकेचे ऐकले कारण ते लष्करी संरक्षणाबाबत अमेरिकेच्या छत्रछायेखाली अवलंबून होते; अजूनही आहेत. चीन बरोबर यापैकी कोणत्याही हात पिरगळण्याच्या टॅक्टीज चालू शकत नाहीत. कारण चीन लष्करीदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सामर्थ्यवान आहे.

२०१५ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा चीनला भविष्यात अमेरिका आपली कोंडी करू शकते याची ठोस जाणीव झाली. आणि चीनने दशक भर पद्धतशीरपणे त्यावर उपाययोजना केल्या. चीनच्या एकूण निर्यातीपैकी अमेरिकेला केली जाणाऱ्या निर्यातीचा वाटा कमी करत आता १३ टक्क्यांवर आणला.

अमेरिकेच्या कर्जरोख्यांमध्ये चीनच्या गुंतवणुकीचे प्रमाण दोन तृतीयांश वर आणले. अमेरिकेने चीनला तंत्रज्ञान देण्याबाबत निर्बंध आणल्यानंतर चीनने नवीन तंत्रज्ञान विकासामध्ये सार्वजनिक पैशातून प्रचंड गुंतवणुकी केल्या.

अमेरिकेचे चीनबरोबर सुरू असलेले युद्ध फक्त आयात करांबाबत नाही. आयात कर एक फ्रंट आहे; झगडा प्रभुत्ववादाचा आहे. त्याच जोडीला चीनने आपले लष्करी सामर्थ्य वाढवले. बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह मार्फत अनेकानेक राष्ट्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकी केल्या. निर्यातीपेक्षा देशांतर्गत मार्केटवर भर देण्यास सुरुवात केली. चीनचे सरकार आणि चीनची केंद्रीय बँक व्याजदर, विनिमय दर इत्यादी बाबतचे निर्णय एकत्रित पणे घेतात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चीनमध्ये दंगली होत नाहीत. दंगलींमुळे दुभंगलेली मने साधायला दोन, तीन पिढ्या खर्ची पडतात. ही समस्या तिथे नाही. चीन डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देऊ शकत आहे ते चीनने गेल्या काही वर्षांत पद्धतशीर कमावलेल्या ताकदीवर. कोणाची छाती किती इंच, कोण किती उच्चरवात धमक्या देते याचा काहीही संबंध नसतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming : संकट असतंच, पण हार मानून कसं चालंल!

October Heatwave : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम

Soybean Procurement : हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करा

Labor Migration : रोजगाराअभावी पुसद तालुक्‍यात मजुरांचे स्थलांतर

Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी २८.५३ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT