Tomato  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Rate : अत्यल्प आवकेने टोमॅटो दरात तेजी

मुकूंद पिंगळे

Nashik Tomato Market: चालू वर्षी उन्हाळी टोमॅटो हंगामामध्ये अगोदर नैसर्गिक आपत्ती, वाढलेली आवक आणि कमी दरामुळे मोठा फटका बसला. तसेच २ ते ३ रुपये किलोने टोमॅटोची विक्री करावी लागली. काही शेतकऱ्यांना तर तोडणी आणि वाहतूक खर्चही निघाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या लागवडी सोडून दिल्या.

परिणामी आता आवक घटल्याने १०० रुपये किलोवर दर मिळत आहेत. मात्र हा लाभ १० ते १५ टक्के टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. तर ८० टक्के शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे एकीकडे दरवाढ दिसत असली तरी मोठे आर्थिक नुकसान हंगामात झाले आहे.

टोमॅटो तोडे सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात काहीसे दर टिकून होते. मात्र मे महिन्यात दरात मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे हतबल काही शेतकऱ्यांनी अक्षरशः गुरे सोडत लागवडी उपटूनही टाकल्या.

मात्र जूननंतर आता बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने दरात तेजी दिसून येत आहे. राज्यभर किमान ५ रुपयांपासून तर कमाल १०० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहेत. तर सरासरी ६० ते ७० रुपये दर आहेत.

यामुळे उत्पादन कमी व आवकेवर परिणाम

टॉमेटो पिकाच्या १५ एप्रिलनंतर लागवडी यशस्वी झालेल्या नाहीत. फूल कळी धारणा अवस्थेत अडचणी आल्या. उन्हाळ्यात कमी होणारी आर्द्रता ही परागीभवनात अडथळा आणत होती. यामुळे सर्व ठिकणी फळधारणा कमी झाली आहे. पानाच्या वाट्या देखील जास्त ठिकाणी झाल्यामुळे फळधारणा व सध्याच्या उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला आहे.

सध्याच्या लागवडीत ५०० ते ८०० क्रेट उत्पादन अपेक्षित आहे, नवीन लागवडी तोडे सुरू व्हायला अजून १ महिना कालावधी आहे, हा मोजक्या उत्पादकांना फायदा मिळणार आहे.सध्या पडत असलेला पाऊस देखील गुणवत्तेत वर विपरीत परिणाम करू शकतो, अशी माहिती के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहायक प्रा. तुषार उगले यांनी सांगितले.

नाशिक बाजारातील गेल्या ५ महिन्यांतील दरस्थिती

मार्च...२,२४,९१३...२५०...७५०...५००

एप्रिल...४६,६२०...५००...९००...७५०

मे...३१,१७४...१००...५५०....३५०

जून...४,५००...५००...८००...७००

राज्यातील टोमॅटो दर स्थिती (ता. ४ जुलै)

बाजार समिती...आवक...किमान..कमाल...सरासरी

नाशिक...९७८...१,८४०...७,०००...६,०००

कोल्हापूर...७८...१,०००...८,५००...४,७००

छत्रपती संभाजीनगर...५४...५,०००...१०,०००...७,५००

पुणे...९२३...३,०००...१०,०००....७,५००

मोशी (पुणे)...१८६...५,०००...८,०००...६,५००

नागपूर...८००...८,०००...१०,०००...९,५००

सोलापूर...५४१...१,४००...१०,५००...४,३००

(संदर्भ : महाराष्ट्र कृषी पणन मंडळ)

मागील पंधरा दिवसांत अपेक्षित दर नसल्याने शिवारात अक्षरशः टोमॅटोचा लाल चिखल झाला. लाखो रुपये वाया गेले. आता टोमॅटोने शंभरी गाठले आहे. मात्र आता आमच्या शिवारात टोमॅटोचे झाडे उरले नाही, खर्चही वसूल नाही.
- अमृत कापडणीस, टोमॅटो उत्पादक शेतकरी, आसखेडा, ता. सटाणा
सध्या गुजरात, राजस्थान, दिल्ली राज्यांत टोमॅटोला मागणी आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागातील स्थानिक माल आवक कमी झाल्याने ही मागणी हळूहळू वाढत आहे. मात्र नाशिक भागात टोमॅटो लागवडी मोठ्या प्रमाणावर सध्या कमी आहेत. बाहेरच्या राज्यात पावसामुळे मोठे नुकसान असल्याने मागणी वाढते आहे. १०० रुपये किलोपर्यंत दर आहेत. पुढील महिनाभर तेजी राहील असे चित्र आहे.
- मंगेश खलसे, संचालक, न्यू दर्शन व्हेजिटेबल कंपनी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT