Mango Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Export : यूएसए, ऑस्ट्रेलियाला हजार टन आंबा निर्यात

मुकूंद पिंगळे

Nashik News : जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणू संशोधन केंद्राच्या कृषक केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. रविवार (ता.९) अखेर एक हजार टन आंबा हा यूएसए आणि ऑस्ट्रेलिया येथे निर्यात झाल्याची माहिती लासलगाव ‘कृषक’चे अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगाव मार्गे झाली असून ९ जूनपर्यंत एक हजार टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे.

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.

मागील वर्षी देखील एक हजार २३ टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषक मधून झाली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच करू लागला आहेत.

लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून हापूस, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.

वर्ष...निर्यात (टन)

२०१८...५८०

२०१९...६८५

२०२२...३५०

२०२३...१०२३

२०२४(९ जून अखेर)...१०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

SCROLL FOR NEXT