Kesar Mango Export : समुद्रमार्गे जपानला केसर आंबा निर्यात

Mango Export : पणन मंडळाच्या प्रयत्नांना यश; ४५ दिवसांनी वाढली टिकवण क्षमता
Mango Export
Mango ExportAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Board of Marketing : पुणे ः केसर आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी नवनवीन विकसित देशांमध्ये निर्यात खुली व्हावी यासाठी पणन मंडळाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश आले आहे. समुद्रमार्गे कमी वाहतूक खर्चात जपानला पहिल्यांदाच केसर आंबा निर्यात करण्यात आला आहे. सोमवारी (ता. १०) साडेसात टन आंबा जपानला पाठविण्यात आल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

या बाबत कदम म्हणाले, ‘‘विविध शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी पणन मंडळाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. यासाठी मंडळाने राज्याच्या विविध भागात शेतीमालनिहाय निर्यात सुविधा केंद्रे उभारली आहेत. सध्या आंबा निर्यातीचा हंगाम सुरू असून, पणन मंडळाकडून अमेरिका, युरोपसह विविध देशांसह जपानला विमानाने यापूर्वी आंबा निर्यात केला आहे. मात्र जपानला समुद्रमार्ग आंबा निर्यातीचे प्रयत्न सुरू होते. जपान ही अतिशय संवेदनशील बाजारपेठ असून, निर्यातीसाठी विविध मापदंड आहेत. ते इतर देशांच्या तुलनेने अतिशय किचकट आहेत. यासाठीचे निर्यातीसाठीच्या करावयाच्या उपचार आणि प्रक्रियेचे मापदंड तयार करण्यात आले होते. यासाठी प्रयोग करण्यात आले होते. या प्रयोगाअंती आंब्याची टिकवण क्षमता आणि दर्जा ४५ दिवसांनी वाढली होती. या सर्व प्रयोगांचा विचार करून, अखेर साडेसात टन आंबा बेरीडेल फूड्‍सद्वारे जपानला समुद्रमार्गे पाठविण्यात आला.’’

Mango Export
Kesar Mango : लाडका केसर आंबा आला

आंब्यावर हे केले उपचार
- सोडिअम हायपोक्लोराइडची ५१ अंश सेल्सिअसची ३ मिनिटांची उष्णजल प्रक्रिया.
- यानंतर ४७.५ अंश सेल्सिअसची व्हेपर हीट ट्रिटमेंट.
- लखनऊच्या सेंटर इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर संस्थेद्वारे ऑरगॅनिक मेट वॉश प्रक्रिया.
- शीतकरण प्रक्रिया.

समुद्रमार्गे दर ५५० रुपयांनी कमी
समुद्रमार्गे आंब्याला प्रति किलोला ५५० रुपये दर विमान वाहतुकीपेक्षा कमी होत असल्याने निर्यातदारांना ही सेवा परवडते आणि जपानच्या बाजारपेठेत तुनलेनेने कमी दराने उपलब्ध होत असल्याने ग्राहकदेखील चांगले उपलब्ध होतात. असा निर्यातदारांचा अनुभव आहे. असे निर्यात विभागाचे उपसरव्यवस्थापक सतीश वराडे यांनी सांगितले.

.

..यांचे मिळाले सहकार्य
आंब्याच्या विविध प्रक्रिया आणि मापदंड निश्‍चित करण्यासाठी ‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव, सचिव डॉ. सुधांशू, सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, सेंटर इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर डॉ. टी. दामोदर आणि बेरीडेल फूड्‍सचे संचालक सर्वानन आचारी यांचे सहकार्य लाभल्याचे संजय कदम यांनी सांगितले.


जपानसारख्या फळे भाजीपाल्यांच्या अतिसंवेदनशील बाजारपेठेत भारतातून समुद्रमार्गे केसर आंबा निर्यात होणे ही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद घटना आहे. समुद्रमार्ग निर्यातीसाठीचे आंब्यावरील उपचार आणि प्रक्रियेसाठीचे विविध मापदंड करण्यासाठी विविध संस्थांच्या अधिकाऱ्यांचे हे यश आहे. यामुळे केसर उत्पादक शेतकऱ्यांसह विविध फळांच्या निर्यातीसाठी हे मापदंड वापरण्यासाठी आत्मविश्‍वास वाढला आहे.
- संजय कदम,
कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com