moong
moong 
मार्केट इन्टेलिजन्स

Moong Production : यंदा मुगाचे एकरी उत्पादन १० पासून ५० किलोपर्यंत

टीम ॲग्रोवन

अकोला ः कमी दिवसात निघणारे मुगासारखे नगदी पीक (Monng) शेतकऱ्यांच्या पसंतीचे बनलेले आहे. दरवर्षी लागवड (Moong Cultivation) क्षेत्र कमी होत असले तरी यंदाही अकोला जिल्ह्यात १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झालेली आहे. मुगाची काढणी (Moong Harvesting) सुरू झालेली असून अनेक ठिकाणी उत्पादन एकरी १० किलोपासून तर ५० किलोदरम्यान मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान झेलावे लागत आहे.

यंदाच्या हंगामात जूनमध्ये असमतोल पाऊस झाल्याने साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुगाची पेरणी सार्वत्रिक सुरt झाली होती. त्यानंतर पावसात सुमारे आठ ते दहा दिवसांचा खंड पडला होता. नंतर महिनाभर सतत पाऊस झाला. बहुसंख्य शेतकऱ्यांना मुगाच्या पिकात कुठलीही आंतरमशागत सुद्धा करता आलेली नव्हती. पुढील काळात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आंतरमशागत, तणनाशक फवारणी तसेच कीटकनाशकांच्या फवारणीसाठी सरसावले होते. त्यानंतर पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरू झाला. यंदा निर्माण झालेल्या अशा विचित्र वातावरणामुळे मुगावर सतत किडीचा प्रादुर्भाव राहिला.

याचाच फटका आता पिकाच्या उत्पादनावर झालेला दिसून येत आहे. मुगाच्या पिकाला एकरी सात ते आठ हजारांपर्यंत खर्च लागलेला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, १० ते ५० किलो दरम्यान उत्पादन मिळत असल्याने यातून आता मळणीचा खर्चही भागवणे कठीण बाब बनलेली आहे. उडदाच्या पिकाचीही अशीच अवस्था आहे. अनेकांनी मूग, उडदाला फूलधारणाच झालेली नसल्याचे पाहून पिकावर ट्रॅक्टर फिरवलेला आहे.

यंदा सुरुवातीपासून मुगाचे पीक अडचणीत होते. दरवर्षी बऱ्यापैकी उत्पादन येते. शेतकऱ्यांच्या हातात दिवाळीपूर्वी या पिकापासून पैसे मिळतात. यंदाची परिस्थिती खूपच वेगळी आहे. २० एकरात अवघे नऊ ते दहा पोते उत्पादन आलेले आहे. आमच्या भागात बहुसंख्य शेतकऱ्यांना एवढेच उत्पादन आल्याने मूग पिकापासून खूप आर्थिक नुकसान सोसावे लागलेले आहे.
अनुप पाटील, मूग उत्पादक, तरोडा, ता. अकोट, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT