Jaggery Market
Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Rate : गूळ दरात वाढ नाहीच

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : हंगामाच्या अंतिम टप्प्यात बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बाजार समितीत दररोज केवळ पाच ते सात हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. मागणीही कमी असल्याने दरातही विशेष वाढ नाही. क्विंटलला सरासरी ३८०० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. पहिल्या दर्जाच्या गुळासच ४००० रुपयांवर दर आहे. मात्र हा गूळ अतिशय कमी येत आहे.

गेल्या महिन्यापासून गूळ बाजारात असणारी तेजी पूर्णपणे ओसरली आहे. संक्रांतीनंतर घटलेले भाव अजूनपर्यंत वाढलेले नाहीत. एकीकडे साखरेचा हंगाम अनपेक्षित रित्या वाढत असताना गूळ हंगाम मात्र थंडावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प सुरू झालेली गुऱ्हाळे हेच यामागचे प्रमुख कारण आहे.

साखर कारखान्याप्रमाणे गुऱ्हाळ घरावरील मजूर ही आता कमी होत आहेत. त्यामुळे अनेक गुऱ्हाळे बंद होत आहेत. शेवटच्या टप्प्यात दिवसेंदिवस गुळाची आवक पुन्हा घटेल, अशी शक्यता आहे. जानेवारीच्या मध्याला संक्रांतीच्या दरम्यान गुळाचे दर सातत्याने ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या आसपास होते. संक्रांतीपर्यंत परराज्यातील व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठी गुळाची खरेदी केली.

यानंतर मात्र शीतगृहासह नियमित खरेदी ही व्यापाऱ्यांकडून कमी करण्यात आली. संक्रांतीनंतर गुळाला मागणी वाढविल्याने व्यापाऱ्यांनी जेवढी दररोजची मागणी आहे, तितक्याच गूळ खरेदीला प्रतिसाद दिला. यामुळे गूळ खरेदीसाठी व्यापाऱ्यांत स्पर्धा लागली नाही. याचाच परिणाम गूळ दर न वाढण्यावर झाला.

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तर फेब्रुवारीच्या तुलनेत आवकेत निम्म्याने घट झाली. जसा उन्हाळा वाढत आहे तशी गुऱ्हाळघरे पटापट बंद होत आहेत. प्रत्येक वर्षी गूळ हंगाम संपताना काही प्रमाणात दर वाढलेले असतात. यंदा मात्र तशी स्थिती नाही.

आवक आणखी घटण्याची शक्यता

सध्या गुळाच्या आवकेत सातत्याने घट होत असल्याने एक एप्रिलनंतर सौदे कदाचित एक दिवसाने निघण्याची शक्यता आहे. एप्रिलनंतर दररोज केवळ दोन ते तीन हजार गूळ रवे बाजार समितीत येण्याची शक्यता आहे. आगामी काळात गुळाची आवक आणखीन कमी होईल, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Sludge : शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला नदीपात्रातील गाळ

Manoj Jarange Patil : बीडच्या दुष्काळ स्थितीचा मनोज जरांगे यांच्या सभेला फटका

Pre Monsoon Rain : वळवाच्या पावसाची अनेक ठिकाणी हजेरी

Omraje Nimbalkar : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तिन तेरा; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ओमराजे निंबाळकर यांची मागणी

Agrotourism Income : कृषी पर्यटनातून साधावी उत्पन्न वाढीची संधी

SCROLL FOR NEXT