Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : ‘नाफेड’मार्फत अद्याप हरभरा खरेदी प्रक्रिया नाही

Chana Market : या हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याला सध्या बाजारपेठांमध्ये प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांवर दर मिळत आहे. यंदा ‘नाफेड’मार्फत केली जाणारी खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

 गोपाल हागे

Akola News : या हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याला सध्या बाजारपेठांमध्ये प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांवर दर मिळत आहे. यंदा ‘नाफेड’मार्फत केली जाणारी खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. हरभऱ्याला हमीभावाएवढा (५४४०) दर बाजारात मिळत असून, केंद्रांसाठी शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याचे कारणही अधिकारी पुढे करत आहेत.

दरवर्षी रब्बीतील हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला नावनोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येते. गेल्या वर्षी मार्चमध्ये नावनोंदणीची प्रक्रिया राबवत खरेदीला प्रारंभ झाला होता. या वर्षी शेतकऱ्यांनी नावनोंदणी करावी याबाबतच आदेश आलेले नाहीत. बाजारात हमीभावाइतक्या दराने हरभरा विकला जात असल्याने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.

या रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वत्र आवक वाढली आहे. बाजारात हरभऱ्याचा दर हा किमान ४८०० पासून कमाल ५७५० पर्यंत मिळत आहे. सरासरी ५५०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा विकला जात आहे.

हमीभाव व खुल्या बाजारातील दरांत तफावत नसल्याने शेतकऱ्यांकडूनही सध्या या केंद्रांची मागणी नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे साडेपाच हजारांचा दर सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.

खेडा खरेदीत हरभरा किमान ४५०० ते कमाल ५००० रुपये दराने खरेदी केला जात आहे. नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास बाजारपेठेतील दर स्थिर राहण्यास मदत होईल, असे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

केंद्र मंजुरीच्या प्रतीक्षेत

हरभरा खरेदीच्या उद्देशाने ‘नाफेड’कडे खरेदी केंद्राची यादी पाठवण्यात आलेली असल्याचे पणन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. येत्या आठवड्यात केंद्र मंजुरीची शक्यता आहे. बाजारात हमीभावाएवढा (एमएसपी) दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून केंद्र सुरू करण्याबाबत मागणी होत नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT