Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : मक्यामध्ये भाववाढीचा कल कायम

डॉ. अरुण कुलकर्णी

Commodity Market Future Prices :

फ्यूचर्स किमती : सप्ताह २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२४

पावसामुळे सर्वच शेतीमालाची आवक या सप्ताहात कमी झाली. समाधानकारक उत्पादनाच्या अपेक्षेने मूग व हरभरा वगळता सर्व पिकांच्या किमती याही सप्ताहात उतरल्या. १ ऑगस्टपासून NCDEX मध्ये मक्यासाठी डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले.

यामुळे MCX मध्ये कापसासाठी या महिन्यात सप्टेंबर, नोव्हेंबर व जानेवारी डिलिव्हरीसाठी, NCDEX मध्ये कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी, मक्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी आणि हळदीसाठी ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार करता येतील. या मालासाठी ऑप्शन करार कोठेच करता येणार नाहीत.

ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यांत नवीन पिकांच्या विक्रीला चांगली किंमत मिळावी म्हणून फ्यूचर्स मार्केटचा कसा उपयोग करावा याचा विचार या व पुढील काही महिन्यांत करावा. मका सध्या भाववाढीचा कल दाखवत आहे. त्यामुळे नोव्हेंबर फ्यूचर्स रु. २,५३४ वर आहे. हा भाव हमीभावापेक्षा १४ टक्के अधिक आहे.

जर हा भाव योग्य वाटला तर फ्यूचर्समध्ये उतरून हेजिंगचा फायदा घेता येईल किंवा फॉरवर्ड डिलिव्हरी भाव ठरवताना या किमतीचा उपयोग करता येईल. कपाशीचा नोव्हेंबर डिलिव्हरी भाव रु. १,५३४ प्रति २० किलो (रु. ७,६७० प्रति क्विंटल) आहे. तो हमीभावापेक्षा (रु. ७,५२१) फक्त २ टक्के अधिक आहे. तेव्हा सध्या तरी फ्यूचर्स बाजारात कपाशीचा व्यवहार करण्याचा विचार करण्यात अर्थ नाही.

२६ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात १.३ टक्का घसरून रु. ५७,२०० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.३ टक्क्याने घसरून रु. ५७,०२० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ५६,५३० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५८,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.७ टक्क्याने अधिक आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरून रु. १,४९४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५३४ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६२ आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. (अनुक्रमे रु. १,४२४ व रु. १,५०४ प्रति २० किलो.)

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. २,५०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. २,४८० वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती ०.९ टक्क्याने घसरून रु. २,५०४ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. २,५३४ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.७ टक्क्याने अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १६,३७० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. १६,२३७ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती १ टक्क्याने घसरून रु. १५,७२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १६,०९६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ३ टक्क्यांनी अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ६,८३० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने वाढून रु. ६,९२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) २.६ टक्क्यांनी वाढून रु. ८,३०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४४४ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,२७१ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा १.८ टक्क्याने घसरून रु. १०,०८३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,७३० होती. या सप्ताहात ती रु. २,७१३ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ५,००० वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. २,३३३ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT