Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement Center : ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रांची संख्या कमी

Cotton Rate : खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी रखडत सुरू आहे. कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्रे सुरू तर काही बंद, अशी स्थिती आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी रखडत सुरू आहे. कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्रे सुरू तर काही बंद, अशी स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. कापूस विक्रीसाठी पुरेशी शासकीय खरेदी केंद्रे नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे.

खानदेशात मागील महिन्यात सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली. जळगाव व अन्य भागांत खरेदी सुरू झाली. खानदेशात सीसीआयची सुमारे ११ खरेदी केंद्रे निश्‍चित झाली होती. खानदेशात नंदुरबारात नंदुरबार, शहादा, धुळ्यात शिरपूर, जळगावात जळगाव, बोदवड, जामनेरातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा येथे कापूस खरेदी केंद्र सीसीआयने निश्‍चित केले होते. परंतु यापैकी काही केंद्रच सुरू असल्याची माहिती मिळाली.

शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत नाही, नोंदणीला कमी प्रतिसाद आहे, असे सीसीआयकडून सांगितले जाते. बाजार समित्यादेखील सीसीआयच्या भूमिकेशी सहमत आहेत. परंतु खरेदी केंद्रात आधार व मोबाइल लिंक (आधार सीडिंग बँक अकाउंट), २०२४-२५ मध्ये कापूस पीक लागवडीची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, कापूस पीकपेरा सातबारा, बँक पासबुकची सत्यप्रत (झेरॉक्स) आवश्यक आहे.

यात अनेक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा ऑनलाइन किंवा ई पीक पाहणीत लावलेला नाही. शेतात कापूस पीक होते, परंतु सातबारावर कापसाला पेरा नाही. नोंदणी करताना कापूस पीकपेऱ्याचा सातबारा हवा आहे, त्याशिवाय नोंदणी केली जात नाही.

यामुळे अनेक शेतकरी खरेदी केंद्रात कापसाची विक्री करू शकत नाही. दुसरीकडे सीसीआय म्हणते खरेदीला प्रतिसाद नाही. खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी आल्यास त्याची सरसकट कुठलेही निकष न लावता व प्राथमिक कागदपत्र घेऊन खरेदी करायला हवी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

कापूस विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याकडून फक्त सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक घेतले जावे, त्यावर कापूस पिकाची नोंद असल्याची सक्ती करू नये, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. तसेच कापसाचा दर्जा सर्वत्र चांगला आहे.

त्याबाबत कुठलेही निकष, तपासणी करू नये, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निकष शिथिल केल्याशिवाय कापूस खरेदीला प्रतिसाद मिळू शकत नाही. कारण शेतकऱ्यांना खरेदी केंद्रात कापूस आणण्यासाठी वाहतूक भाडेही द्यावे लागते.

खेडा खरेदीत हमीभाव मिळेना

सध्या कापसाला हमीभावापेक्षा कमी दर खेडा किंवा थेट खरेदीत मिळत आहेत. हमीभाव या स्थितीत सीसीआय, शासनाने आढावा घेऊन खरेदीसंबंधी केंद्रसंख्या वाढवावी व खरेदीस वेग द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT