Jowar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dadar Jowar : खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक

Jowar Rate : खानदेशात दादर ज्वारीची आवक मागील पंधरवड्यात आणखी वाढली आहे. दरावर दबाव कायम असून, कमाल दर २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीची आवक मागील पंधरवड्यात आणखी वाढली आहे. दरावर दबाव कायम असून, कमाल दर २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. दर मागील हंगामाच्या तुलनेत कमी असून, यंदा दादर ज्वारी उत्पादकांचा हिरमोड झाला आहे.

मागील हंगामात दादर ज्वारीची आवक बऱ्यापैकी होती. परंतु दरात सतत सुधारणा झाली. कमाल दर ५४०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला होता. परंतु यंदा सुरवातीपासून दर कमी आहेत. दरात घट झाली आहे.

यंदा दादर ज्वारीची आवक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली. या कालावधीत दादर ज्वारीचे दर कमाल ३३०० रुपये प्रतिक्विंटल होते. सध्या किमान २२५० व कमाल २९५० व सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दादर ज्वारीस आहे. आवक सर्वत्र बऱ्यापैकी आहे.

दादर ज्वारीसाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत सध्या रोज मिळून सहा हजार क्विंटल दादर ज्वारीची आवक होत आहे.

यंदा अनेकांनी कृत्रिम जलसाठ्यांच्या आधारावर पेरणी केली होती. यामुळे यंदा दादर ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी झाली. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीच्या क्षेत्रात झाली होती. काळ्या कसदार जमिनीत दादर ज्वारीचे पीक जोमात आले आहे.

ज्वारीची कापणी व मळणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकाच वेळी कापणी व मळणीचे काम सुरू झाल्याने आवकही सध्या वाढली आहे. आवक पुढेही टिकून राहील, असे संकेत आहेत.

जळगावात कोरडवाहू ज्वारीची आवक

चोपडा येथील बाजार समितीत बुधवारी (ता.२०) दादर ज्वारीची १२०० क्विंटल आवक झाली. तेथे किमान २२२५, कमाल २९३५ व सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर ज्वारीस मिळाला. जळगाव येथील बाजार समितीतही कमाल दर २९०० रुपये प्रतिक्विंटल होता. कोरडवाहू दादर ज्वारीची आवक जळगाव बाजार समितीत अधिक होत आहे. या ज्वारीस चांगला उठाव असून, दरही मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Latest Update : मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; राज्यात मॉन्सून सरींची हजेरी

Brown Biorefinery: ‘ब्राउन बायोरिफायनरी’तून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन

Women Farmers: भूमिकन्यांसाठी पुढचे पाऊल

Sugarcane Crop Protection: उसात वाढतोय जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव

Ladki Bahin Yojana e-KYC: लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'साठी संधी मिळणार का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT