Team Agrowon
राज्यात यंद रब्बी ज्वारी लागवडी खालील क्षेत्रात वाढ झाली.
खरीपात पावसानं अनेक भागात उघडीप दिल्यानं रब्बीत पाण्याचं नियोजन पाहून शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिली.
पण किड रोगांमुळे उत्पादकता घटल्याचं शेतकरी सांगतात. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे दाणे काळे पडले.
त्यामुळे उत्पादकतेत घट येण्याची शक्यता अधिक आहे. हिंगोली जिल्ह्यात ज्वारी काढणीला सुरुवात झाली आहे.
शेतकरी मधुकर टापरे यांनीही किड रोगाचा ज्वारीला फटका बसल्याचं सांगितलं.
पाण्याच्या अभावी मराठवाड्यातील जिल्ह्यात रब्बी ज्वारीची शेतकऱ्यांनी लागवड केली होती.