Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Industry : महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशचा साखर कोटा घटविला

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने जूनच्या कोट्यातील साखर वाटप करताना महाराष्‍ट्र व उत्तरप्रदेश या साखर उत्पादनातील राज्यांचा साखर कोटा घटविला आहे. महाराष्ट्राचा कोटा मेच्या तुलनेत आठ टक्क्यांनी तर उत्तरप्रदेशचा कोटा दीड टक्क्यांनी घटविला आहे.

कर्नाटकातील साखर कारखान्यांनाही ११ टक्के साखर कोटा कमी मिळाला आहे. गेल्‍या महिन्याच्या तुलनेत बिहारला सर्वाधिक १४ टक्के कोटा वाढवून दिला आहे. दोन महिन्यापूर्वी केंद्राने दिलेल्या साखर कोट्याइतकीच साखर कारखान्यांनी विकावी, असे आदेश काढले होते.

एखादा कारखाना कोट्यापेक्षा जास्त साखर विकत असेल तर त्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्‍याची अंमलबजावणी तातडीने करताना केंद्राने देशातील ६३ कारखान्यांना गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी कोटा दिला. हे कारखाने प्रामुख्याने उत्तरप्रदेश व महाराष्ट्रातील असल्याने या दोन राज्यांच्या एकूण साखर कोट्यावर या कारवाईचा परिणाम झाला आहे.

केंद्राने दोन दिवसांपूर्वीच साखर कारखान्यांना २५.५० लाख टनांचा कोटा जाहीर केला. हा कोटा जाहीर करण्यापूर्वी कोणत्या कारखान्यांनी किती साखर विकली याचे निरीक्षण केले. काही कारखान्यांनी कोट्यापेक्षा जास्‍त साखर विकून आदेशाचा भंग केल्याचे निदर्शनास येताच या कारखान्यांवर कोटा घटीची कारवाई केली.

मेच्या पूर्वाधात काही कारखान्यांनी दर चांगला असल्याने कारखान्यांनी जादा साखर विक्रीचा प्रयत्न केला. पण कारखान्‍यांनी केलेली जादा साखर विक्री केंद्राला रुचली नाही. त्यांनी या कारखान्यांवर कोटा कपातीची कारवाई करत आपला इरादा स्पष्ट केला. केंद्राने बिहार, छत्तीसगड, मध्‍यप्रदेश, ओरिसा, राजस्थान या राज्यांचे साखर कोटे मे च्या तुलनेत वाढविले. आंध्रप्रदेश, गुजरात, हरियाना, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड आदी राज्यातील कारखान्यांना साखर कोटे कमी मिळाले आहेत.

राज्‍यांना मिळालेला साखर कोटा

राज्य...मिळालेला साखर कोटा (टनांत)

आंध्रप्रदेश...१६८२९

बिहार...६०४४८

छत्तीसगड...४१५२

गुजरात...८२५११

हरियाना...५४४७५

कर्नाटक...३११३३१

मध्यप्रदेश...५७५२२

महाराष्ट्र...९३५८०५

ओरिसा...५२८

पंजाब...३९३९२

राजस्थान...२१०८

तमिळनाडू...६१५८३

तेलंगणा...३९६९

उत्तरप्रदेश...८९०८१३

उत्तराखंड...२६७३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT