Sugar Market : साखर कारखान्यांना जूनसाठी २५.५० लाख टनांचा कोटा

Sugar Industry : साखरेची मागणी कमी झाल्याने केंद्राने लवचिक भूमिका घेताना जून महिन्‍याचा साखर कोटा मे महिन्याच्या तुलनेत दीड लाख टनाने घटविला आहे.
Sugar Market
Sugar MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : साखरेची मागणी कमी झाल्याने केंद्राने लवचिक भूमिका घेताना जून महिन्‍याचा साखर कोटा मे महिन्याच्या तुलनेत दीड लाख टनाने घटविला आहे. जून महिन्यासाठी देशातील कारखान्यांना २५.५० लाख टनांचा कोटा मंगळवारी (ता. २८) जाहीर केला. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने एक्स सोशल अकाउंटवरून या निर्णयाची माहिती दिली. १ जूनपासून साखर कारखान्यांना या कोट्याप्रमाणे साखर विक्री करता येईल.

मेसाठी तब्बल २७ लाख टनांचा साखर विक्री कोटा केंद्राने दिला होता. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत मात्र यंदाच्या जून महिन्याचा कोटा २ लाख टनाने जास्त आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात २३.५० लाख टनांचा साखर कोटा दिला होता. यंदाच्या मे महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत साखरेला चांगली मागणी होती. मेनंतर मात्र साखरेला मागणी कमी अधिक राहिली. मागणीत सातत्‍य नसल्याने दर ३६०० ते ३७०० रुपये क्विंटलच्या दरम्यान राहिले.

Sugar Market
Sugar Production : पुढील हंगामात उसासह साखर उत्पादन घटीची शक्यता

एप्रिलच्या उत्तरार्धापासून ते मेच्या पूर्वार्धापर्यंत कारखान्‍यांना साखरेची विक्री करणे सुलभ गेले. मागणीत सातत्य असल्याने व्यापाऱ्यांकडून मागणीही सातत्‍याने होत होती. यामुळे देशातील अनेक कारखान्यांना केंद्राने दिलेल्‍या कोट्याइतकी साखर विक्री करता आली. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून लग्न मुहूर्त कमी झाले.

Sugar Market
Sugar Smuggling : निर्बंध तोडत साखरेची बांगलादेशला तस्करी

तसेच निवडणुकांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवरही मर्यादा आल्‍याने शीतपेय उद्योग वगळता अन्‍य साखर विक्रीत काहीशी घट झाली. साहजिकच गेल्या पंधरा दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे २० ते ५० रुपयांची चढ उतार राहिली. सध्या देशातील अनेक बाजारपेठांमध्ये साखरेच्या दरात फारशी तेजी नसल्याची स्‍थिती आहे.

काही राज्यामध्ये स्थिर तर काही राज्यांमध्ये सातत्याने चढ-उतार अशी स्‍थिती सध्‍या साखरे बाजाराची आहे. सध्या महाराष्‍ट्र व गुजरातमध्ये ३६०० ते ३७०० कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल इतके साखर दर आहेत.

साखर विक्री आव्हानात्मक

सध्या पावसाळ्याची (Rain) चाहूल लागली आहे. पावसाने वेळेत सुरू केल्यास जूनपासून शीतपेय उद्योगांतूनही मागणी कमी राहील. यामुळे कारखान्यांना या महिन्यात साखर विक्री करणे आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे.

यंदाचा हंगामही आता संपत आला आहे. यामुळे जूनपासून साखर निर्मितीही थांबेल. पुढील हंगाम सुरू होईपर्यंत पुरेसा साठा देशात राहील याची खबरदारी घ्‍यावी लागणार असल्याने मे च्या तुलनेत जूनमध्ये साखर कोटा कमी केल्याची माहिती केंद्रीय सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com