Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Stock Limit : तुरीवरील स्टॉक लिमिट पाळा

Tur Market Update : केंद्र सराकरने राज्यांना दरावर लक्ष ठेवण्याचे तसेच स्टॉक लिमिटचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना केल्या.

Team Agrowon

Pune News : तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकार प्रत्येक पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. केंद्र सराकरने राज्यांना दरावर लक्ष ठेवण्याचे तसेच स्टॉक लिमिटचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना केल्या. तसेच सरकारी गोदाम कॉर्पोरेशन्सच्या अधिकाऱ्यांना तुरीच्या स्टॉकची माहिती देण्यास सांगितले.

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने बुधवारी (ता. १४) तूर आणि उडदाच्या भावासंदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीला राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यांच्या अन्न विभागांना स्टॉक लिमिटचे कडक पालन करण्याच्या सूचना केल्या.

तसेच राष्ट्रीय वेअरहाऊस कॉर्पोरेशन आणि राज्य वेअरहाऊस कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना वेअरपाऊसमधील तुरीच्या स्टॉकची माहिती देण्याच्या सूचना केल्या होत्या. स्टॉक लिमिटचे पालन न करणाऱ्या व्यापारी, प्रक्रिया उद्योग आणि आयातदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही राज्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

देशात तूर आणि उडदाची साठेबाजी होत असल्याचे केंद्राने अनेकदा स्पष्ट केले. त्यामुळे भाव वाढत असल्याचा दावाही सरकारने केला. त्यामुळे केंद्र सरकारने २ जून रोजी तूर आणि उडदावर ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत स्टॉक लिमिट लावले.

सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना आणि मोठ्या विक्री साखळी संस्थांना २०० टन साठ्याची मर्यादा दिली. तर किरकोळ व्यापाऱ्यांना आणि एका किरकोळ विक्री केंद्राला ५ टनांची मर्यादा आहे. प्रक्रिया उद्योगांना वार्षिक क्षमतेच्या २५ टक्क्यांपर्यंत साठा ठेवता येणार आहे. तसेच सर्वांनी आपल्याकडील साठ्याची माहिती देण्याचेही आदेश दिले.

सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत तूर आणि उडदाचे भाव, तसेच व्यापारी, उद्योग आणि आयातदारांनी दिलेली साठ्याची माहिती, सोबतच राष्ट्रीय आणि राज्य वेअरहाऊस कॉर्पोरेशन्सचे आणि संलग्न वेअरऊसेसमध्ये असलेल्या साठ्यावर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय वेअरहाऊस कॉर्पोरेशन आणि राज्य वेअरहाऊस कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना तूर आणि उडदाच्या साठ्याची माहिती अधिक सविस्तर गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत तुरीच्या बाजारावर सविस्तर चर्चा केली. व्यापारी, विक्रेते आणि आयातदारांनी बॅंकेकडे गहान ठेवलेला माल, पोर्टलवर स्टॉकची दिलेली माहिती आणि स्टॉक लिमिट यावर अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

केंद्राच्या समित्यांचे काम सुरू

तुरीच्या वाढत्या भावाची सविस्तर माहिती घेण्यासाठी केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने मार्च महिन्यात निधी खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. ही समिती राज्य सरकारांसोबत आयातदार, मिलर्स, स्टॉकिस्ट, व्यापारी आदी बाजारातील घटकांकडील तुरीच्या साठ्यावर नजर ठेवत आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रेदश आणि तमिळनाडूतील स्थानिक पातळीवर जाऊन माहिती घेण्यासाठी १२ अधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात आली होती. या समित्यांचे कामही सुरू असून सरकारला माहिती देण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुर दरावर दबाव कायम; वांग्याच्या दरात सुधारणा, डाळिंब व मोहरी वधारली, बाजरीचा भाव स्थिर

Maize Snail Attack : उगवत्या अंकुरावर गोगलगायींचे आक्रमण

Cucumber Farming : खरीप काकडीचे अधिक उत्पादन शक्य

Adhala Dam : अकोला तालुक्यातील आढळा धरण भरले; शेतकरी सुखावला

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पर्यावरणस्नेहीं ५ लाख ग्राहकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT