Tur Rate : तुरीच्या दरवाढीचा कल कायम

Tur Bajarbhav : या सप्ताहात शासनाने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले. मक्याचे हमीभाव ६.५ टक्क्यांनी, तुरीचे ६.१ टक्क्यांनी, मूगाचे १०.४ टक्क्यांनी, सोयाबीनचे ७ टक्क्यांनी, तर कापसाचे मध्यम व लांब धाग्यांसाठी अनुक्रमे ८.९ व १०.६ टक्क्यांनी वाढवले आहेत.
Tur Rate
Tur RateAgrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती - सप्ताह - ३ ते ९ जून २०२३

Market Committee : या सप्ताहात शासनाने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले. मक्याचे हमीभाव ६.५ टक्क्यांनी, तुरीचे ६.१ टक्क्यांनी, मूगाचे १०.४ टक्क्यांनी, सोयाबीनचे ७ टक्क्यांनी, तर कापसाचे मध्यम व लांब धाग्यांसाठी अनुक्रमे ८.९ व १०.६ टक्क्यांनी वाढवले आहेत.

या सप्ताहात कापूस, मका, हरभरा व मूग यांच्या किमती घसरल्या. तुरीच्या किमतीतील वाढता कल याही सप्ताहात कायम राहिला. कांद्यातील घसरण आता थांबलेली दिसते.

९ मे रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ५८,३४० वर आले होते. या सप्ताहात ते ०.३ टक्क्याने घसरून रु. ५८,१८० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स भाव रु. ५९,८०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.६ टक्क्याने अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४५८ वर आले होते. या सप्ताहात ते १ टक्क्याने घसरून रु. १,४४४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे नवीन वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

Tur Rate
Cotton Market : कापूस जूनमध्ये पहिल्यांदाच दबावात; पुढे काय होणार?

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या महिन्यात घसरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्याने घसरून रु. १,७९५ वर आल्या होत्या. त्या सप्ताहात त्या पुन्हा ०.८ टक्क्याने घसरून रु. १,७८० वर आल्या आहेत.

फ्यूचर्स (जुलै डिलिव्हरी) किमतीसुद्धा ०.९ टक्क्याने घसरून रु. १,७९५ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती रु. १,८१६ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २ टक्क्यांनी अधिक आहेत. नवीन वर्षासाठी मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात १.५ टक्क्याने घसरून रु. ७,३७० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने वाढून रु. ७,४६९ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती १ टक्क्याने वाढून रु. ७,९६५ वर आल्या आहेत.

ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. ८,२५० वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १०.५ टक्क्यांनी अधिक आहेत. डिसेंबर भावसुद्धा (रु. ८,५४४) चांगला आहे. फ्यूचर्स विक्रीला अनुकूल संधी आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,००० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ४,९०० वर आल्या आहेत. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ८,००० वर आली आहे. आवक गेल्या दोन सप्ताहांत वाढू लागली आहे. मुगाचा नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ८,५५८ आहे.

Tur Rate
Tur Import : सरकारच्या धोरणामुळेच तूर आयातीची वेळ?

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती एप्रिल महिन्यात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,१५१ वर आली होती. या सप्ताहात ती ०.५ टक्क्याने वाढून रु. ५,१७६ वर आली आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ४ टक्क्यांनी वाढून रु. ९,१५० वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ३.७ टक्क्यांनी वाढून रु. ९,४९२ वर आली आहे. तुरीचा नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ७,००० आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ई-मेल : arun.cqr@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com