Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Stock Limit : तुरीचे स्टॉक लिमिट आता डिसेंबरपर्यंत

Tur Market Update : मागणी आणि पुरवठ्यातील तफावत तसेच बाजारात नवीन तूर येण्यास अद्याप बराचसा कालावधी आहे. त्यामुळे तुरीचे दर नियंत्रणासाठी पूर्वीचे स्टॉक लिमिट आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : मागणी आणि पुरवठ्यातील तफावत तसेच बाजारात नवीन तूर येण्यास अद्याप बराचसा कालावधी आहे. त्यामुळे तुरीचे दर नियंत्रणासाठी पूर्वीचे स्टॉक लिमिट आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहे. कृत्रिम टंचाई होऊन दरवाढ होऊ नये याकरिता प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याशिवाय बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक ठिकाणी पीक करपले. त्यामुळे सरासरी उत्पादनात घट झाली. त्यानंतरच्या काळात कृत्रिम टंचाईसाठी काही व्यापाऱ्यांकडून साठेबाजी करण्यात आल्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे तुरीची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने तुरीचे दर क्विंटलमागे १२५०० ते १३००० रुपयांपर्यंत पोहोचले होते. किरकोळ दरही तेजीत आले; मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत होता. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून तुरीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी साठवणुकीवर मर्यादा आणण्यात आली आहे.

सद्यःस्थितीत नागपूरच्या कळमना बाजारात तुरीला १०५०० ते ११००० रुपयांचा दर मिळत आहे. यंदाच्या खरिपातील तूर फेब्रुवारीपर्यंत बाजारात विक्रीला येणार आहे. परिणामी दर नियंत्रणासाठी घाऊक व्यापारी आणि मोठ्या विक्री साखळी संस्थांना ५० टन स्टॉक मर्यादा लावण्यात आली आहे.

याशिवाय प्रक्रियादारांना एकूण क्षमतेच्या दहा टक्‍के साठ्याची मर्यादा आहे. यापूर्वी ही मर्यादा दुपटीने जास्त होती. आता साठेबाजी होऊ नये याकरिता पुरवठा व कृषी विभागाच्या माध्यमातून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. तूर व उडदाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी देखील प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती बाजारातील दर (रुपयांत)

७ सप्टेंबर ः १०५०० ते ११०००

२६ सप्टेंबर ः ११५०० ते १२०००

२८ सप्टेंबर ः १०५०० ते ११६००

३ ऑक्टोबर ः १०७०० ते ११५००

७ ऑक्टोबर ः १०५०० ते १११००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT