Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : देशातील केळी निर्यातीची गती कायम

Banana Market : एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत देशातून सुमारे २५ हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात झाली.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : केळी निर्यातीत देशातून यंदाही वाढ दिसत आहे. केळी निर्यातीत राज्यानेही चांगली कामगिरी केली असून, सोलापूरचा त्यात पहिला क्रमांक कायम आहे. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत देशातून सुमारे २५ हजार कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात झाली. २०२२-२३ च्या तुलनेत ही निर्यात सुमारे साडेसात ते आठ हजार कंटेनरने वधारली आहे. केळी निर्यात कायम आहे.

इस्राईल व आखातात तणाव असल्याने निर्यातीसंबंधी अडचणी आहेत. सुएझ कालव्याऐवजी आफ्रिकेला वळसा घालून निर्यात सुरू आहे. यात निर्यातीसंबंधी भाडेवाढ झाल्याने निर्यातीच्या केळीचे दर मात्र कमी आहेत किंवा त्यात मोठी वाढ झाली नाही.

निर्यातक्षम केळी कमी

केळी निर्यातीत महाराष्ट्र पुढे आहे. देशातील एकूण केळी निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ६३ टक्क्यांपर्यंत आहे. या पाठोपाठ गुजरात, आंध्र प्रदेश व केरळ येथून केळी निर्यात होत आहे. देशात आता बारमाही केळी निर्यातीसाठी उपलब्ध आहे. राज्यात केळी लागवडीत जळगाव पुढे आहे. परंतु निर्यातीत सोलापूरने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. राज्यात केळी निर्यात सुरू आहे.

पण गती संथ आहे. कारण निर्यातक्षम केळी कमी आहे. राज्यात सर्वाधिक निर्यात सोलापूर भागातून झाली आहे. सोलापुरात उन्हाळ्यात केळी निर्यातीसाठी उपलब्ध नव्हती. या कालावधीत खानदेशात केळी अधिकची उपलब्ध झाली. रोज १०० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) केळी मार्च ते मे या कालावधीत खानदेशात निर्यातीसाठी उपलब्ध झाली. अजूनही खानदेशातून केळीची निर्यात सुरू आहे. रोज पाच कंटेनर केळीची निर्यात खानदेशातून आखातात केली जात आहे.

दरात जूननंतर सुधारणा

खानदेशात एप्रिल ते जून या कालावधी केळी दर कमी होते. मार्च व एप्रिलमध्ये निर्यातक्षम केळी अधिकची काढणीवर आली. देशांतर्गत व निर्यातीसाठी मिळून खानदेशात रोज ६०० ट्रक केळी काढणीसाठी एप्रिल व मेमध्ये उपलब्ध होती. या कालावधीत केळी दर कमी झाले. किमान ४०० ते ७०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

परंतु केळी दरात जुलैत वाढ सुरू झाली. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये निर्यातीच्या केळीला खानदेशात किंवा उत्तर महाराष्ट्रात सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जुलैनंतर निर्यातीच्या केळीचे दर सतत वाढले. ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत टिकून होते. सध्या देशातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून केळीची निर्यात सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT