soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन अजूनही सहा हजारांच्या खालीच

यंदा सोयाबीनचा बाजार थंड असल्याचे चित्र जिल्ह्यात असून अजूनही भाव सहा हजारांवर जाऊ शकलेले नाहीत. गतवर्षी दहा हजार रुपयांचा पल्ला पार करणारे सोयाबीन यंदा मात्र साडेपाच हजाराच्या आसपासच अडकले आहेत.

टीम ॲग्रोवन

अमरावती : यंदा सोयाबीनचा बाजार (Soybean Market) थंड असल्याचे चित्र जिल्ह्यात असून अजूनही भाव सहा हजारांवर जाऊ शकलेले नाहीत. गतवर्षी दहा हजार रुपयांचा पल्ला पार करणारे सोयाबीन (Soybean Rate) यंदा मात्र साडेपाच हजाराच्या आसपासच अडकले आहेत.

केंद्राने डीओसी व पाम तेल आयात करण्याच्या धोरणाचा फटका सोयाबीनच्या स्थानिक बाजारात बसू लागला असून, जिल्ह्यात या वर्षी अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. पीक कापणीच्या प्रयोगात जिल्ह्याची उत्पादनाची सरासरी हेक्टरी सात क्विंटल इतकी खाली आली आहे.

त्यामुळे या वर्षी साडेतीन ते पावणेचार लाख क्विंटल सोयाबीन जिल्ह्यात होण्याचा अंदाज आहे. बाजार समितीमध्ये आवक अजूनही दहा हजार क्विंटलच्या वर जाऊ शकली नसून मंगळवारी (ता. २२) ती ८,७८३ पोत्यांची होती. लिलावात सोयाबीनला ४,५२१ ते ५,५६० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर बियाण्यांच्या सोयाबीनला ५,६०० ते ५,९५० रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सहा हजार रुपयांवर भाव येथील बाजारात मिळू शकलेला नाही.

केंद्राने डीओसी व पामतेल आयात करण्याचे धोरण लागू केल्याने त्याचा देशांतर्गत सोयाबीन बाजारावर विपरीत परिणाम झाला आहे. यंदा देशांतर्गत उत्पादन कमी असल्याने व स्टॉकिस्ट बाजारात आल्याने भाव वाढण्याचा अंदाज होता.

- राजेश पाटील, खरेदीदार,

बाजार समिती, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT