Soybean and Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hingoli Market: हिंगोलीमध्ये सोयाबीन, हळदीच्या दरात नरमाई

Market Rate Update: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर दबावात आहेत. तर हळदीच्या दरात नरमाई आहे. हिंगोली धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शुक्रवारी (ता. २) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होती.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर दबावात आहेत. तर हळदीच्या दरात नरमाई आहे. हिंगोली धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शुक्रवारी (ता. २) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ३७९० ते ४२९० रुपये, तर सरासरी ४०४० रुपये दर मिळाले. संत नामदेव हळद मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २) हळदीची १९६० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १३००० रुपये, तर सरासरी १२०० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. २) हरभऱ्याची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५४४५ ते कमाल ५५७० रुपये, तर सरासरी ५५०७ रुपये दर मिळाले. गव्हाची (शरबती) १२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २७९५ ते कमाल ३२९५ रुपये, तर सरासरी ३०४५ रुपये दर मिळाले. ज्वारीची ६५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल होऊन प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २०४५ रुपये, तर सरासरी १७७२ रुपये दर मिळाले.

सोयाबीनचे दर दबावातच

बुधवारी (ता. ३०) सोयाबीनची १००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३७५० ते कमाल ४२५० रुपये, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २८) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३८३५ ते कमाल ४३३५ रुपयेस तर सरासरी ४०५० रुपये दर मिळाले.

आवक वाढल्याने हळद दरात नरमाई

बुधवारी (ता. ३०) हळदीची २११० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान १०५०० ते कमाल १२८०० रुपये, तर सरासरी ११६५० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २८) हळदीची १९०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ११००० ते कमाल १३५०० रुपये, तर सरासरी १२२५० रुपये दर मिळाले.

हरभरा दरात चढ-उतार

बुधवारी (ता. ३०) हरभऱ्याची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५०२० ते कमाल ५४२० रुपये, तर सरासरी ५२२० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २९) हरभऱ्याची ३६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५४५५ ते कमाल ५५३० रुपये, तर सरासरी ५४८७ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT