Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात घसरण

सोयाबीन शेतकऱ्यांचे हक्काचे नगदी पीक आहे. खरिपातील पिकांमध्ये शेतकऱ्यांना उडीद-मुगानंतर हमखास पैसे देणारे दुसरे नगदी पीक म्हणजे सोयाबीन. मात्र आता सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला असतानाच शेतकरी चिंतेत आहेत.

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : सोयाबीन (Soybean) शेतकऱ्यांचे हक्काचे नगदी पीक आहे. खरिपातील पिकांमध्ये शेतकऱ्यांना उडीद-मुगानंतर (Urad) हमखास पैसे देणारे दुसरे नगदी पीक म्हणजे सोयाबीन. मात्र आता सोयाबीन काढणीला (Soybean Harvesting) प्रारंभ झाला असतानाच शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Market Rate) घसरण झाली आहे. मंगळवारी (ता. ४) सोयाबीनला चार हजार ते चार हजार आठशे रुपयांचा दर मिळाला. हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे भाव पडल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

गेल्या वर्षीचा सोयाबीन हंगाम संपताना सोयाबीनने विक्रमी भाववाढ नोंदवली होती. या भाववाढीचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना झाला होता. यंदा, सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली आहे. खरीप हंगामात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अनेक भागांत अतिवृष्टीने फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक उद्ध्वस्त झाले. शेतात राहिलेल्या सोयाबीनच्या पीक काढणीला प्रारंभ झाला आहे.

लागवडीचा खर्च निघण्याची चिंता

गतवर्षी सोयाबीनला विक्रमी दर प्राप्त झाले होते. त्यामुळे यंदाही चांगले भाव मिळतील, या आशेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. सध्याचे भाव पाहता शेतकऱ्यांच्या आशेवर पाणीच फिरल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या शेतीमाल घरात असताना सोयाबीन दर पाच हजारांच्या खाली आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सध्या सोयाबीनला चार हजार सहाशे ते पाच हजार असा दर मिळाला आहे. या दरामुळे सोयाबीन लागवडीचा खर्चही वसूल होतो की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

सोंगणी, काढणीच्या दरात वाढ

एकीकडे भाव पडलेले असतानाच दुसरीकडे सोयाबीन सोंगणीच्या आणि काढणीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या सोंगणीचे दर दोनशे रुपयांनी वाढले आहेत. गेल्या वर्षी दोन हजार रुपये असलेला सोंगणीचा दर या वर्षी दोन हजार दोनशे रुपयांवर पोहोचला आहे. या सोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सोयाबीन काढणीचा म्हणजेच थ्रेशरिंगचा खर्चही वाढणार आहे. त्यामुळेच सोयाबीनच्या लागवडीचा खर्चही निघतो की नाही, असा यक्ष प्रश्‍न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cotton Procurement: कापूस खरेदीत महाराष्ट्र पिछाडीवर

Maharashtra Cold Wave: पावसाला पोषक हवामान, हुडहुडी कमी होणार

Krushi Samruddhi Yojana: अहिल्यानगरला कृषी समृद्धी योजनेसाठी सव्वा बावीस कोटी

Rabi Season: शेतकऱ्यांना रब्बीचा आधार

Foodgrain Production: भारतानं धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला, भात उत्पादन सर्वाधिक, विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT