Soybean Rate : सोयाबीन उत्पादकतेला सततच्या पावसाचा फटका

सोयाबीन काढणीला प्रारंभ झाला असून, यंदा तीन ते आठ क्विंटलदरम्यान सरासरी उतारा येत असल्याने अनेकांना खर्चाचा ताळमेळही जुळवणे कठीण झालेले आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

अकोला ः सोयाबीन काढणीला (Soybean Harvesting) प्रारंभ झाला असून, यंदा तीन ते आठ क्विंटलदरम्यान सरासरी उतारा (Soybean Productivity) येत असल्याने अनेकांना खर्चाचा ताळमेळही जुळवणे कठीण झालेले आहे. आता पावसाने (Rain) उघाड दिल्यानंतर सोयाबीनच्या मळणीला जोमाने सुरुवात झाली. दुसरीकडे बाजारात नव्या सोयाबीनचा दर अवघा पाच हजारांच्या आत मिळत असल्याने दुहेरी संकटात सोयाबीन उत्पादक अडकला आहे.

यंदाच्या हंगामात सतत पावसाचे वातावरण राहिल्याने सोयाबीनच्या उत्पादकतेला फटका बसला. शेंगधारणा तसेच दाणे परिपक्व होण्याच्या काळात आलेल्या पावसाने अधिक नुकसान केले. शेतांमध्ये अनेक दिवस पावसाचे पाणी साचलेले होते. सोयाबीन पाण्यात राहिल्याने झाडांवरील शेंगा परिपक्व होऊ शकल्या नव्हत्या.

Soybean Rate
Soybean Harvesting : सोयाबीन ची काढणी करताना या गोष्टी लक्षात घ्या

काही शेंगांमध्ये दाणेच नाहीत. यामुळे आता सोयाबीनची काढणी सुरू झाली तेव्हा उत्पादकता कमी असल्याचे समोर आले. अनेक शेतकऱ्यांना एकरी तीन क्विंटलपासून उत्पादन येत आहे. तर अधिकाधिक ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू लागलेले होते. वास्तविक यंदा सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढला.

Soybean Rate
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दर टिकणार का?

बियाणे, रासायनिक खते, कीडनाशकांची फवारणी आणि आता कापणीचा खर्चसुद्धा वाढलेला आहे. सोयाबीन कापणी एकरी ३ हजारांपेक्षा अधिक दराने केली जात आहे. आता बाजारात सोयाबीनचा दर ३८०० पासून ५००० रुपयांपर्यंत आहे.

शासनाने खरीप हंगामासाठी ५८ पैसेवारी जाहीर केली आहे. मुळात उत्पादन कमी होत असताना आलेली पैसेवारी सर्वांसाठी चिंताजनक बनलेली. वास्तविक जिल्हाधिकारी शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ भरपाई देण्याची विमा कंपनीला सूचना केली होती. कंपनीने उत्पादन चांगले असल्याचे सांगत हा निर्देश झुगारलेला आहे.

या वर्षी मी तीन एकरांत सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती. त्यामध्ये दोनदा तणनाशक व कीटकनाशक, बुरशीनाशक, एनपीके खतांची चारवेळा फवारणी घेतली. आता सोयाबीनची काढणी केली असता १० क्विंटल उत्पादन आले. लावलेला खर्च आणि आलेल्या उत्पादनातून आता खर्चाचा ताळमेळ बसणे शक्य दिसत नाही.
गोपाल भालतिलक, सोयाबीन उत्पादक, बोर्डी, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com