Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादकतेचा प्रश्न

Soybean Production : जागातील सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये काही भागात सोयाबीनची काढणी सुरु झाली. ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज असल्याने सोयाबीनचा बाजार दबावात आहे.

अनिल जाधव

Pune News : जागातील सर्वात मोठ्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये काही भागात सोयाबीनची काढणी सुरु झाली. ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज असल्याने सोयाबीनचा बाजार दबावात आहे.पण ब्राझीलमधील काही राज्यांमध्ये उत्पादन कमी येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाजही कमी होत आहेत.

जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक ब्राझील आपले स्थान टिकवून आहे. ब्राझीलमध्ये सोयाबीनचा पसारा मोठा आहे. ब्राझीलमध्ये एकिकडे पेरणी संपत नाही तोवर दुसरीकडे पीक काढणीला येते. आपल्याकडे लागवडीचा कालावधी महीना-दीड महिन्याचा असतो.

ब्राझीमध्ये लागवड सप्टेंबरमध्ये सुरु होते आणि डिसेंबरपर्यंत लांबते. एखाद्या वेळी वातावरणानुसार उशीर होतो किंवा लवकरही पेरा आटपतो. म्हणजेच सुरुवातीला ज्या भागात पेरणी झाली त्या भागातील पीक, शेवटी पेरणी होते त्याच काळात काढणीला आलेले असते.

यंदाही असेच झाले. ब्राझीलमधील काही भागात सोयाबीनची काढणी आता सुरु झाली. काढणीचा वेग कमी कारण पहिल्या टप्प्यातील काम सुरु आहे. अजूनही एकूण पेरणीच्या एक टक्क्याही पिकाची काढणी झाली नाही. पण ज्या भागात काढणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली त्यापैकी बहुतांशी शेतकरी उत्पादकता कमी आल्याचे सांगत आहेत.

ब्राझीलमधील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्य माटो ग्रोसोमध्ये सोयाबीन काढणीचा वेग काहीसा अधिक आहे. पण या माटो ग्रोसो राज्यात सुरुवातीला आणि मध्यल्या काळात पिकाला पोषक हवामान नव्हते. त्यामुळे माटो ग्रोसोमध्ये यंदा उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटल्याचेही शेतकरी सांगत आहेत. तसेच माटो ग्रोसो राज्यातील काही भागात नुकताच पाऊस झाला. यामुळेही सोयाबीन काढणीत अडचणी येत आहेत.

माटो ग्रोसोसोबतच रोंडोनियामध्ये काढणीचा वेग काहीसा जास्त आहे. तर गोयास आणि माटो ग्रोसो डू सूल राज्यातही काढणीच्या कामाला सुरुवात झाली. या राज्यांमध्ये काही शेतकरी उत्पादकता कमी आल्याचे सांगत आहेत. महत्वाच्या सोयाबीन उत्पादक रिओ ग्रॅंडे डू सूल राज्यात दोन महिन्यांमध्ये चांगला पाऊस झाल्याने पेरणी उशीरा झाली. याचाही उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो.

काही भागात अडचणी

ब्राझीलमधील काही भागातील शेतकऱ्यांची स्थिती आपल्या शेतकऱ्यांप्रमाणेच असल्याचे दिसते. काही भागात उत्पादकता घटल्याने उत्पादन खर्चही भरून निघणार नाही, असे काही शेतकरी सांगत असल्याचे वृत्त आहे. पण पराना राज्यात सोयाबीनची उत्पादकता अपेक्षेप्रमाणे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

उत्पादनाचे अंदाज काय?

ब्राझीलच्या अनेक भागात सुरुवातीच्या काढणीत उत्पादकता कमी आल्याने मागील काही आठवड्यांपासून ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचे अंदाज कमी झाले आहेत. अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजेच युएसडीएच्या ब्राझीलमधील कार्यालयाने सोयाबीन उत्पादनाचा आपला अंदाज जाहीर केला. या अहवालात ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज कमी करून १५८५ लाख टनांपर्यंत कमी केला. या कार्यलायाचा आधीचा अंदाज १६१० लाख टनांचा होता.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील उष्ण आणि कोरडे वातावऱण, सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि कमी झालेला मातीतील ओलावा, या कारणांमुळे उत्पादकता कमी झाली, असे या अहवालात म्हटले आहे. ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज आता कमी होत आहे हे स्पष्ट आहे.

काही संस्थांनी तर अंदाज १५१० लाख टनांपासून १५३० लाख टनांच्या दरम्यान अंदाज दिले. पण जागतिक सोयाबीन बाजाराचे लक्ष आहे ते ब्राझीलच्या कोनाब आणि युएसडीएच्या मुख्य अहवालाकडे. या दोन संस्थांचे अंदाज काय येतात यावरून बाजारत घडामोडी घडताना दिसतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT