Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : राज्यात सोयाबीन खरेदीने ओलांडला एक कोटी क्विंटलचा टप्पा

Soybean Market : राज्यात हमीभावाने या हंगामात आतापर्यंत १ कोटी १२ लाख १३,८४८ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी खरेदी केलेले सोयाबीन वेअरहाऊसला साठवले गेलेले नाही.

 गोपाल हागे

Akola News : राज्यात हमीभावाने या हंगामात आतापर्यंत १ कोटी १२ लाख १३,८४८ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी खरेदी केलेले सोयाबीन वेअरहाऊसला साठवले गेलेले नाही. जोपर्यंत हा शेतीमाल वेअरहाऊसमध्ये डिपॉझिट होण्याची प्रक्रिया पार पडणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे चुकारेसुद्धा लटकून राहणार आहेत. शिवाय बंपर सोयाबीन खरेदीमुळे आता तूर खरेदीचा मुहूर्तही लांबत चालल्याचेही बोलले जात आहे. केवळ नोंदणीची प्रक्रियाच तेवढी होत आहे.

बाजारात सोयाबीनला चार हजारांच्या आत दर मिळत असल्याने या वर्षी शेतकरी शासकीय खरेदी केंद्राकडे जात आहेत. त्यामुळेच कधी नव्हे ते एक कोटी १२ लाख १३,८४८ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. सोयाबीन खरेदी सहा फेब्रुवारीपासून बंद झालेली असून मुदतवाढ होईल किंवा नाही, याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे आता तूर खरेदीसाठी शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे.

अशा स्थितीत तूर खरेदीची प्रक्रिया नोंदणीच्या अनुषंगाने सुरू झालेली आहे. खरेदीदार एजन्सींना नोंदणी करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे. बाजारपेठेत तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्रांची गरज निर्माण झालेली आहे. तूर नोंदणीला सुरुवात होताच नोंदणीला वेग आला आहे. शेतकरी मोठ्या संख्येने नावनोंदणी करू लागले आहेत. राज्यात यंदा तुरीची १२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पेरणी झालेली आहे.

वेअरहाऊस तुडूंब भरले

सोयाबीन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने वेअरहाउसमध्ये अनेक ठिकाणी माल साठवायला अनेक दिवसांची प्रतीक्षा आहे. वाहने जागेवरच उभी राहिलेली आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन गोदामात डिपॉझिट झाल्यानंतरच चुकारे मार्गी लागत असतात.

सध्या माल संथ गतीने डिपॉझिट होत असल्याने चुकारे विलंबाने सुरू आहेत. सोयाबीन साठवण्यासाठी वेअरहाउसमध्ये जागा नसताना आता तूर खरेदी सुरू झाल्यानंतर ती साठविण्याचा प्रश्‍न उद्भवण्याची शक्यता खरेदी यंत्रणेतील अधिकारी व्यक्त करीत आहेत. सोयाबीनची विल्हेवाट लावून जागा रिक्त झाली तर तूर ठेवणे शक्य होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Education Policy: प्रश्‍न विचारा पुन्हा पुन्हा ...

Maharashtra Marketing Board: नव्या व्यवस्थेत न्याय मिळेल?

Heavy Rainfall: जुन्नर-नारायणगाव परिसरात पावसाचा दणका

Vice Chancellorship Selection: कुलगुरू पदासाठीच्या मुलाखतीला चौकशीच्या भोवऱ्यातील शास्त्रज्ञ

Government Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार?

SCROLL FOR NEXT