Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Bajarbhav: शेतकऱ्यांनी विकले ५७ लाख टन सोयाबीन; ३७ लाख टन हमीभावापेक्षा एक हजाराने कमी भावात विकण्याची वेळ

Soybean Market: देशात यंदा सोयाबीन उत्पादन वाढले असले तरी बाजारातील आवक मात्र घटली आहे. सरकारची खरेदी थांबल्याने आणि भाव कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

Anil Jadhao 

Pune News: चालू हंगामात पहिल्या ४ महिन्यांमध्ये देशातील बाजारात सोयाबीनची आवक ५७ लाख टनांवर झाली. गेल्यावर्षीपेक्षा आवक आणि गाळप ५ लाख टनाने कमी राहीले. तर सोयापेंडची निर्यातही दीड लाख टनाने कमी राहून जवळपास ८ लाख टनांवर स्थिरावली आहे. बाजारात आतापर्यंत आवक झालेल्या सोयाबीनपैकी सरकारने जवळपास २० लाख हमीभावाने खेरदी केली. शेतकऱ्यांना जानेवारीपर्यंत ३७ लाख टन सोयाबीन हमीभावापेक्षा कमी भावात विकावे लागले.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने नुकताच आपला आहवाल प्रसिध्द केला. या अहवालात चालू हंगामातील पहिल्या ४ महिन्यांचा म्हणजेच ऑक्टोबर ते जानेवारी या काळातील सोयाबीनची आवक, गाळप, आयात आणि निर्यात याची माहीती देण्यात आली. या अहवालातून स्पष्ट होते की, पहिल्या ४ महिन्यांमध्ये गेल्यावर्षी याच काळात झालेल्या आवकेच्या तुलनेत कमी आवक बाजारात झाली होती.

गेल्यावर्षी याच काळात ६२ लाख टन सोयाबीन शेतकऱ्यांनी विकले होते. मात्र यंदा केवळ ५७ लाख ५० हजार टन सोयाबीन शेतकऱ्यांनी विकले. विशेष म्हणजे यंदा देशातील सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढल्याचा अंदाज आहे. तरीही देशातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. यंदा देशात सोयाबीन उत्पादन १२६ लाख टन होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच एकूण उत्पादनापैकी केवळ ४५ टक्के माल बाजारात आला असे सोपाने म्हटले आहे.

सोयाबीनचे गाळपही यंदा कमी झाले. मागील वर्षी पहिल्या चार महिन्यांमध्ये ४७ लाख टन सोयाबीनचे गाळप झाले होते. मात्र यंदा गाळप ४२ लाख ५० हजार टनांवरच स्थिरावले. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच बाजारातील सोयाबीनची आवक कमी आहे. कारण सोयाबीनचा बाजार मंदीत आहे.

यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षा किमान ९०० रुपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी थांबले होते. मात्र सोयाबीनची हमीभावाने खरेदी ६ फेब्रुवारी रोजी बंद झाली. त्यामुळे बाजारातील आवक आता वाढत आहे. मात्र दुसरीकडे बाजाभावातही नरमाई दिसून आली. सोयाबीनचा भाव मागील काही दिवसांपासून २०० रुपयांनी कमी झाला. सध्या बाजारात सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे.

देशात यंदा सोयाबीनचे भाव मंदीत असल्याने आयात मात्र झाली नाही. मागील हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी या काळात दीड लाख टन आयात झाली होती. मात्र यंदा आयात काहीच झाली नाही. कारण बाजारभाव पडतळ खात नाहीत. याचा परिणाम आयातीवर झाला आहे. पण बाजारभाव कमी असल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. सोयाबीनला सध्या बाजारात केवळ ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांना हमीभापेक्षा किमान एक हजार रुपये कमी भाव मिळत आहे. तर दुसरीकडे सरकारची खरेदीही थांबली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Sugar Production: देशात जुलैअखेर साखरेचे २५८ लाख टन उत्पादन

Agriculture Department: 'कृषी’तील बदल्यांचा सावळागोंधळ सुरू

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

SCROLL FOR NEXT