Soybean DOC Export: सोयापेंडची निर्यात घटली; फ्रान्स, जर्मनी ठरले भारताच्या सोयापेंडचे मोठे ग्राहक

India Soybean Market: देशातून सोयापेंडची निर्यात यंदा घटली असली तरी फ्रान्स, जर्मनी, आणि नेदरलॅंड हे देश भारतीय सोयापेंडचे प्रमुख ग्राहक ठरले आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात निर्यात ८ लाख टनांवर स्थिरावली असून, मागील वर्षीच्या तुलनेत दीड लाख टनांची घट झाली आहे.
Soybean DOC
Soybean DOCAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशात यंदा सोयापेंडची निर्यात कमी झाली आहे. चालू हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोयापेंड निर्यात दीड लाख टनाने कमी होऊन ८ लाख टनांवरच स्थिरावली आहे. त्यातही फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅंड आणि नेपाळला चांगली निर्यात झाली आहे. तसेच देशात यंदा सोयाबीनचे गाळप कमी होऊन सोयापेंड निर्मतीही कमी झाली, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने आपला अहवाल नुकताच प्रसिध्द केला. या अहवालात देशातील सोयाबीनची जानेवारीपर्यंतची बाजारातील आवक, गाळप, आयात-निर्यात, सोयापेंड निर्मिती, सोयापेंडचा वापर आणि निर्यात याची माहीती दिली. चालू हंगामात सुरुवातीपासूनच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी भाववाढीच्या आशेने थांबले आहेत. त्यातही आता सरकारची खरेदी बंद झाली. याचा परिणाम दरावर दिसत असला तरी काही दिवसांपासून बाजारातील आवक वाढलेली आहे.

Soybean DOC
Soybean Procurement: अडीच लाख शेतकरी नोंदणी करूनही सोयाबीन खरेदीच्या प्रतिक्षेत

देशात जानेवारीच्या शेवटपर्यंत ४२ लाख ५० हजार टन सोयाबीनचे गाळप झाले. त्यातून ३३ लाख ५४ हजार टन सोयापेंची निर्मिती झाली. मागील वर्षी याच काळात ४७ लाख टनांचे गाळप होऊन त्यातून ३७ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास साडेचार लाख टनांनी सोयापेंड निर्मिती कमी झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांतील तुलना केल्यास यंदा या तीनही महिन्यात कमी सोयाबीन गाळप आणि कमी सोयापेंड निर्मिती झाली. तर केवळ जानेवारी महिन्यात गाळप काहीसे यंदा अधिक होऊन सोयापेंड निर्मितीही अधिक झाली.

Soybean DOC
Soybean Bhavantar : सोयाबीन खरेदी आणि भावांतरसाठी किसान सभेची उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सोयापेंड निर्मितीचा विचार करता, यंदाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये निर्यात जवळपास दीड लाख टनांनी कमी झाली. गेल्या हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये ९ लाख ३४ हजार टन निर्यात झाली होती. यंदा मात्र निर्यात ७ लाख ९६ हजार टनांवरच स्थिरावली. सोयापेंड निर्यात पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कमीच राहीली. मात्र जानेवारी महिन्यात निर्यात नगण्य प्रमाणात वाढली होती. जानेवारी २०२५ मध्ये २ लाख ७८ हजार टन निर्यात झाली. तर जानेवारी २०२४ मधील निर्यात २ लाख ७५ हजार टन झाली होती.  

फ्रान्स, जर्मनीचा आधार

देशातून यंदाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये फ्रान्स आणि नेदरलॅंडला चांगली निर्यात झाली आहे. तर शेजारच्या बांगलादेश, नेपाळ आणि इतर देशांना होणारी निर्यात काहीशी माघारली आहे. चार महिन्यात भारतातून सर्वाधिक १ लाख २७ हजार टन निर्यात फ्रान्सला झाली. तर जर्मनीला १ लाख ३ हजार टन झाली. नेपाळला ९० हजार टन, नेदरलॅंडला ८५ हजार टन आणि बांगलादेशला ७६ हजार टन सोयापेंडची ऑक्टोबर ते जानेवारीच्या दरम्यान निर्यात झाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com