Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : उत्पादनवाढीच्या अंदाजाने सोयाबीन बाजार मंदीत

Soybean Production : गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव चार वर्षांतील सर्वांत नीचांकी पातळीवर आहेत.

अनिल जाधव

Pune News : गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव चार वर्षांतील सर्वांत नीचांकी पातळीवर आहेत. अमेरिकेतील सोयाबीन पुढच्या महिन्यात बाजारात येईल.

यंदा तिथेही सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज आहे. शेतकरी मागील हंगामातील सोयाबीन विक्री करत आहेत. त्यामुळे बाजारावर दबाव वाढून भाव पाडले आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारावर होत आहे.

अमेरिकेत यंदा उत्पादनवाढीचा अंदाज आणि त्यात शेतकऱ्यांची विक्री वाढल्याचा दबाव दरावर आला आहे. परिणामी, सोयाबीन ऑगस्ट २०२० च्या पातळीवर पोहोचले आहे. सीबॉटवर सोयाबीनचे वायदे सोमवारी (ता. १२) दुपारपर्यंत ९.८४ डॉलर प्रतिबुशेल्सच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते.

मागणी घटली

सध्या जागतिक बाजारात खाद्यतेल बाजार दबावात आहे. पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या भावाचा सोयातेलावर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे सोयापेंडेला मागणी कमी झाली. चीनची सोयाबीन खरेदीही अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यातच अमेरिकेत उत्पादनवाढीचे अंदाज आल्याने सोयाबीनला उठाव कमी झालेला आहे. शेतकऱ्यांनी स्टॉकमधील सोयाबीनही विक्री सुरू केली. मात्र त्या तुलनेत मागणी नाही. याचा दबाव सोयाबीनच्या दरावर आला.

मंदीचे वातावरण

उत्पादनवाढीचे अंदाज, शेतकऱ्यांची विक्री, सट्टेबाजांची विक्री आणि घटलेली मागणी यामुळे बाजारात मंदीचे वातावरण तयार झाले. अमेरिकेत उत्पादन वाढीच्या अंदाजाने पुरवठा वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ब्राझील आणि अर्जेंटिनाही यंदा उत्पादनवाढीची अपेक्षा बाळगून आहेत. या सर्व घडामोडींमुळे सोयाबीन बाजारात मंदीचे वातावरण असून भाव गेल्या ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

ऑगस्टमधील घडामोडींकडे लक्ष

सध्या उत्पादनवाढीचा अंदाज असल्याने बाजारावर दबाव आहे. पण ऑगस्ट महिना अमेरिकेच्या सोयाबीन पिकासाठी महत्त्वाचा असतो. अमेरिकेत सध्या सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. मागील आठवड्यातही काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. त्याचा परिणाम पिकावर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच पुढील काही दिवस अमेरिकेच्या बहुतांशी भागात कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्येही हवामान कसे राहील त्याचा फार मोठा परिणाम अमेरिकेच्या पिकावर होणार आहे. त्यामुळे या दोन ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये हवामान कसे राहील? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

देशातील परिस्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील बाजारावर परिणाम होत आहे. देशात सोयाबीन ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. पण नव्या हंगामातील उत्पादन किती राहील? हे पुढच्या दोन महिन्यांतील पाऊसमान आणि काढणीच्या काळात वातावरण कसे राहते? यावर अवलंबून असेल.

सध्या वाढलेली लागवड आणि अनेक भागात पुरेसा पाऊस यामुळे उत्पादन वाढीचे अंदाज आहेत. सध्या उत्पादन वाढीचे अंदाज असले तरी प्रत्यक्ष काढणीच्या काळात किती उत्पादन हाती येईल? यावर बाजाराची दिशा ठरेल. मात्र सध्या तरी वातावरण मंदीच्या बाजूने दिसते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT