soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन बाजाराची नजर ब्राझीलकडे का?

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचे दर तेजीत आहेत. यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन घटले. तसेच चीनसह इतर देशांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे.

अनिल जाधव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचे दर (Soybean Rate Global Market) तेजीत आहेत. यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) घटले. तसेच चीनसह इतर देशांची मागणीही (Soybean Demand) वाढण्याची शक्यता आहे. पण सोयाबीन बाजारावर ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादन प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे जागतिक सोयाबीन बाजाराचे ब्राझीलकडे विशेष लक्ष आहे.

जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझीलने २०१९-२० मध्ये अमेरिकेला मागे टाकले. आजपर्यंत अमेरिकेला सोयाबीन उत्पादनात भरारी घेऊन प्रथम क्रमांक परत मिळवता आला नाही. अमेरिकेचा सोयाबीन हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान सुरु होतो. भारतातही याच काळात सोयाबीन पीक बाजारात यायला सुरुवात होते. यंदा अमेरिकेत गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर भारतातही सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर पुन्हा वाढत आहेत. रशियाने युक्रेनमधून होणारी शेतीमाल वाहतूक पुन्हा बंद केली. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफुल तेलाचा पुरवठा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळं खाद्यतेल आणि तेलबियांच्या दरात वाढ झाली. अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन घटले त्यामुळे बाजाराला आधार मिळाला. मात्र बाजाराची खरी नजर ही लागवडी सुरु झालेल्या ब्राझील आणि अर्जेंटीनाकडे आहे.

काय परिणाम होईल?

यंदा या दोन्ही देशांमधील सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. ब्राझीलमध्ये यंदा विक्री १ हजार ५२० लाख टनांवर सोयाबीन उत्पादन पोचेल, असे युएसडीए सांगत आहे. म्हणजेच यंदा ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन २५० लाख टनांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. अर्जेंटीनाचही उत्पादन ५६ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. असे झाल्यास सोयाबीन बाजाराची दिशाच बदलेल. जागतिक बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढून दर दबावात येतील. आणि अंदाज चुकले तर सोयाबीन बाजारातील तेजी कायम राहील.

अभ्यासक काय म्हणतात?

मात्र बाजारातील अभ्यासकांना हा अंदाज मान्य नाही. ब्राझीलमध्ये यंदा पेरा वाढत असला तरी ला निनो च्या स्थितीमुळे पुढील काळात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. हीच परिस्थिती अर्जेंटीनातही उद्भवणार आहे. एकूणच काय तर सध्या ब्राझील आणि अर्जेंटीनात विक्रमी उत्पादनाचे अंदाज असले तरी अंतिम उत्पादन कमी राहण्याचाच अंदाज बहुतेक अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT