Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : बाजार समित्यांत सोयाबीनची आवक शिगेवर

Soybean Update : एकीकडे दिवाळीची धामधूम, दुसरीकडे सोयाबीन हंगाम शिगेला पोचलेला आणि त्यातच रब्बीची लगबग अशा परिस्थितीत शेतकरी सध्या व्यग्र झाला आहे.

Team Agrowon

Akola News : एकीकडे दिवाळीची धामधूम, दुसरीकडे सोयाबीन हंगाम शिगेला पोचलेला आणि त्यातच रब्बीची लगबग अशा परिस्थितीत शेतकरी सध्या व्यग्र झाला आहे. दिवाळी सणामुळे आता बहुतांश बाजार समित्या थेट ४ नोव्हेंबरलाच सुरू होणार आहेत. यामुळे सोयाबीन विक्रीसाठी आता आठवडाभर बाजार उघडण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सोयाबीन हंगाम सध्या शिगेवर आहे. सोयाबीन काढणी तसेच सोयाबीन विक्रीसाठीही लगबग सुरू आहे. दिवाळी सणामुळे शेतकरी शेतीमाल विक्रीला प्राधान्य देत आहेत. दिवाळीसोबतच रब्बी तयारीसाठी पैशांची तजवीज म्हणून बाजारात सोयाबीन विक्रीला काढले जात आहे. गेले आठवडाभर या भागातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दररोज हजारो क्विंटल आवक सुरू झाली होती. अकोल्यात पाच हजार क्विंटलवर आवक पोचली होती.

वाशीम, कारंजा, मूर्तिजापूर, मलकापूर, चिखली, खामगाव, मेहकर अशा सर्वच महत्त्वाच्या बाजार समित्यांतील आवकेने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली होती. त्यातच मंगळवारपासून (ता.२९) दिवाळी सणामुळे बाजार समित्या ३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी खेडा खरेदीवर विसंबून राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सलग पाच ते सहा दिवस बाजार बंदमुळे सोयाबीन विक्रीत अडचणी तयार होणार आहेत. खेडा खरेदी ओल्या सोयाबीनला अवघा तीन हजारांपासून दर दिला जात आहे.

नाफेड खरेदीला प्रतिसाद नाही

या भागात सोयाबीनला हमीभावापेक्षा एकीकडे दर कमी मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे शासनाने सुरू केलेल्या नाफेड खरेदीला निकषामुळे प्रतिसाद नाही. शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे, परंतु खरेदीसाठी निकषात बसणारा माल मिळेनासा आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनाने १३ तालुका व काही मोठ्या गावांत एकूण १६ केंद्रांना मंजुरी दिली. परंतु कुठेही माल विक्रीसाठी आलेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कदाचित आता दिवाळीच्या पर्वानंतर या केंद्रावर सोयाबीन विक्रीला येईल अशी अपेक्षा आहे. निकषानुसार सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांचा ओलावा अपेक्षित आहे. मात्र सध्या सोयाबीनमध्ये सुमारे १५ ते १६ टक्क्यांवर आर्द्रता असल्याने हा माल नाफेडच्या खरेदी निकषात बसत नाही. अकोला जिल्ह्यातही एक-दोन केंद्रांवर झालेला मुहूर्त वगळता सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही. खरेदी केंद्र संचालक निकषात बसेल अशा सोयाबीनच्या विक्रीला येण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात २२१ उमेदवारांचे ३२४ अर्ज दाखल, आज होणार छाननी

Farmers Deewali : कोकणकरांची दिवाळी शिवारातच; पावसाने भात कापणी लांबणीवर, काही ठिकाणी भात पिकाचे नुकसान

Paddy Farming : भात शेतीतील मिथेन उत्सर्जन कमी करणारे सोपे तंत्रज्ञान

Agriculture Technology : बीज प्रक्रियेसाठी नॅनोप्राइमर्स तंत्रज्ञानाचा वापर

Agriculture Technology : कापणी यंत्रे वापरतानाच्या समस्या, त्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT