Banana Export
Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : केळी लागवड, निर्यातीत सोलापूरचा टक्का वाढला

सुदर्शन सुतार

Banana Cultivation सोलापूर ः ऊस, डाळिंब आणि द्राक्षाची (Grape) ओळख सांगणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षांत केळी क्षेत्रात (Banana Acreage) वाढ होत आहे. तसेच एकूण क्षेत्र, उत्पादन (Banana Production) आणि निर्यातीतला (Banana Export) टक्काही वाढतो आहे.

सध्या जिल्ह्यात केळीची १६ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. तर निर्यातीतला वाटाही जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

यंदा एकूण क्षेत्रात सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मुख्यतः पाण्याचा शाश्‍वत स्रोत आणि उच्चतम, गुणवत्तापूर्ण केळीसाठी पोषक वातावरण ही त्यामागची कारणे आहेत.

सोलापूर हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण अलीकडच्या काही वर्षांत उजनी धरणाच्या पाण्यामुळे हे चित्र बदलले आहे.

त्यात जिल्ह्यातील माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यांना लाभलेला भीमा नदीचा काठ आणि दुसरीकडे माळशिरस, सांगोला या भागाला मिळालेले नीरा-देवघर, नीरा-भाटघरसारख्या प्रकल्पाचे पाणी हे महत्त्वाचे कारण आहे.

त्यामुळेच या पट्ट्यात आता ऊस, द्राक्ष आणि डाळिंबाबरोबर केळीचे क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वातावरणही केळीसाठी पोषक असल्याने त्याचाही फायदा होतो. परिणामी, उच्चतम आणि गुणवत्तापूर्ण केळी उत्पादन मिळते. आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे जिल्ह्यात वर्षातील बाराही महिने केळीची लागवड करता येऊ शकते.

तसेच पुणे, मुंबईसह उत्तर भारतातील प्रमुख बाजारपेठा आणि परदेशातील मागणीनुसार अर्थात मार्केटच्या शेड्यूलनुसारही काही केळी उत्पादक बागांची लागवड करत असल्याने वरचेवर क्षेत्र टिकून राहते आहे.

केवळ क्षेत्रवाढच नव्हे, तर उत्पादनही चांगल्या पद्धतीने आहे. जिल्ह्यात प्रतिएकरी सरासरी ३० टनापर्यंत केळी उत्पादन घेतले जाते.

करमाळा, माळशिरसला सर्वाधिक क्षेत्र

जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यांत केळी लागवड होते आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे १५ हजार ७७१.४० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. त्यात करमाळा आणि माळशिरस तालुक्यात सर्वाधिक लागवड आहे. करमाळ्यात ६९७८ हेक्टर आणि माळशिरस तालुक्यात ३७७६ हेक्टर इतकी लागवड आहे.

त्यानंतर पंढरपुरात २७५६ हेक्टर, माढ्यात १२७१ हेक्टर, मोहोळमध्ये ६८५ हेक्टर, सांगोल्यात १४१ हेक्टर, अक्कलकोटला ४३ हेक्टर, मंगळवेढ्यात ५ हेक्टर, उत्तर सोलापुरात २५ हेक्टर, दक्षिण सोलापुरात १३.४० हेक्टर आणि बार्शी तालुक्यात ७८ हेक्टर इतकी लागवड आहे.

कंदर बनले केळीचे हब

करमाळा तालुक्यातील कंदर हे तर जणू केळीचे हब झाले आहे. उजनी धरणाचा बॅकवॅाटर या गावाला लाभल्याने गावातील वातावरण केळीला एकदम पोषक आहे.

आज गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे अगदी एक एकरपासून ५० एकरांपर्यंत आणि त्याहूनही अधिक क्षेत्रावर केळी आहे. एकट्या कंदरमध्ये सुमारे एक हजार हेक्टरवर लागवड आहे.

केळीच्या या लागवडीमुळेच आज अनेक निर्यातदार कंपन्यांनी त्यांची कार्यालये थेट कंदरमध्ये थाटली आहेत. त्या माध्यमातूनही शेतकऱ्यांकडील केळीचे व्यवस्थापन केले जाते.

निर्यातीत ५० टक्के वाटा

गेल्या वर्षी संपूर्ण देशभरातून इराण, इराक, बहरीन या आखाती देशांसह अन्य देशांमध्ये केळीची सुमारे १६ हजार कंटनेर इतकी निर्यात झाली. त्यात तब्बल ८५०० कंटेनर म्हणजे जवळपास ५० टक्के कंटेनर एकट्या सोलापूर जिल्ह्यातील होते.

अर्थात, केळी निर्यातीतील जिल्ह्याचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत राहिला. यंदाही आता आखाती देशातून रोज किमान ५०० कंटेनर केळीची मागणी आहे. पण सध्या ६५ ते ७० कंटेनर आपण पुरवू शकतो, त्यातही पुन्हा ५० टक्के कंटेनर एकट्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

गेल्या चार वर्षांमध्ये केळीच्या क्षेत्रात तीन पटीने वाढ झाली आहे. विशेषतः करमाळ्यासह माढा, माळशिरस, पंढरपूर हे तालुके त्यात

आघाडीवर आहेत. पण अलीकडे केळीचा उत्पादन खर्च वाढतो आहे. त्यासाठी केळी उत्पादकांना सरकारने आर्थिक साह्य द्यायला हवे.

-किरण डोके, प्रगतिशील केळी उत्पादक, कंदर, ता. करमाळा

पाण्याचा शाश्‍वत स्रोत आणि पोषक वातावरणामुळे केळीचे क्षेत्र वाढते आहे. ‘मनरेगा’तून केळी लागवडीसाठी प्रोत्साहन देतो आहोत. सूक्ष्म सिंचन योजनेचाही फायदा शेतकऱ्यांना होतो आहे.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT