Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : खानदेशात मका आवकेत घट, दरात किंचित वाढ

Maize Rate : मक्याची आवक एप्रिल महिन्यात वेगात सुरू होती. या महिन्यात खानदेशातील प्रमुख बाजारांत रोज प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटल मक्याची आवक झाली.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मका आवकेत मागील चार ते पाच दिवसांत घट झाली आहे. दरातही किंचित सुधारणा दिसत असून, कमाल दरपातळी २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचली आहे.

मक्याची आवक एप्रिल महिन्यात वेगात सुरू होती. या महिन्यात खानदेशातील प्रमुख बाजारांत रोज प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटल मक्याची आवक झाली. सर्वाधिक आवक जळगाव, चोपडा, अमळनेर या भागात सुरू होती.

या महिन्यातही एक ते सहा तारखेदरम्यान चांगली आवक झाली. परंतु मागील चार ते पाच दिवसांत सर्वत्र आवक कमी झाली आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी मक्याचे दर बाजारांत प्रतिक्विंटल १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

थेट किंवा शिवार खरेदीत कमाल दर २०५० रुपये प्रतिक्विंटल असे काही खरेदीदार, एजंट देत होते. परंतु जशी आवक कमी झाली तसे दर २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत.

जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजारांत मिळून रोज अडीच हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार व शहादा येथेही आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vijay Wadettiwar: 'चंद्रपूर में टायगर अभी जिंदा हैं'; काँग्रेसच्या ८ नगराध्यक्षांच्या विजयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vela Amavasya: वेळा अमावास्येनिमित्त शेतशिवार फुलले

Farmers Issue: यंत्राच्या साह्याने ऊसतोड; चाऱ्याची टंचाई

Kagal Nagar Parishad: कागलमध्ये मुश्रीफ- घाटगे युतीचं काय झालं?; संपूर्ण निकाल हाती

Bajra Sowing: बाजरीची आगाप पेरणी सुरू

SCROLL FOR NEXT