Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली आहे. किमान व कमाल दरात किंचित सुधारणा झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (ता.१०) सोयाबीनची १२८५ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४७०० ते कमाल ४९५० रुपये तर सरासरी ४८५० रुपये दर मिळाले.
रविवार (ता. ५) ते शुक्रवार (ता.१०) या कालावधीत एकूण सोयाबीनची ७ हजार ६९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ४६२५ ते ४८५० रुपये दर मिळाले.
गुरुवारी (ता. ९) सोयाबीनची ११४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४७५० ते कमाल ४९१० रुपये तर सरासरी ४८५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ८) सोयाबीनची ११९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४७५० ते कमाल ४९१० रुपये तर सरासरी ४८५० रुपये दर मिळाले.
मंगळवारी (ता.७) सोयाबीनची १४२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४७५० ते कमाल ४९१० रुपये तर सरासरी ४८०० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ६) १३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६५० ते कमाल ४८७० रुपये तर सासरी ४८०० रुपये दर मिळाले.
रविवारी (ता. ५) सोयाबीनची १३५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४८०० रुपये तर सरासरी ४६२५ रुपये दर मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.