Mango Season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Season : हापूसच्या दरात किंचितशी घट

Mango Rate : नियमित हापूस हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. त्यानंतर बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत हापूसची आवक वाढल्यामुळे आतापर्यंत प्रतिडझन ७०० ते १००० रुपये असलेला हापूसचा दर आता ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आला आहे. हा दर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

नियमित हापूस हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. त्यानंतर बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. त्यानुसार जिल्ह्यात सध्या आंब्याची आवक वाढली आहे. अधिकतर हापूस वाशी मार्केट आणि राज्यभरातील विविध बाजारपेठांत पाठविला जातो.

कोरोनानंतर अनेक बागायतदार थेट विक्रीवरच भर देऊ लागले आहेत. परंतु त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठांत देखील आंबा विक्री केली जात आहे. जिल्ह्यातील विविध बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात हापूस विक्री सुरू आहे.

दोन आठवड्यांपूर्वी हापूसचा दर प्रतिडझन हा ७०० ते १००० रुपये इतका होता. तोच दर आता ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आला आहे. आंबा पेटीचा दर २००० हजार ते २२०० रुपयांपर्यंत आहे. हापूसचा दर पुढील महिनाभर कायम राहण्याची शक्यता आहे.

मागणीतही वाढ

जिल्ह्यात मुंबईकर मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे हापूसची आवक वाढली असली तरी त्याच प्रमाणात बाजारपेठांत हापूसची मागणी देखील वाढलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GMO Indian Rice : चीनने भारताचा तांदूळ परत पाठवला; तांदळात जीएमओ असल्याचा आरोप

Water Level Drops: गिरणा धरणातील जलसाठा घटू लागला

Agrowon Podcast: मका भाव दबावातच; सोयाबीनची आवक मंदावली, कापूस आवक स्थिर, गहू आवक सुधारली तर तूर दर स्थिर

Grape Farmers Loss: द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, नैसर्गिक आपत्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील ७५ टक्के क्षेत्र बाधित

School Nutrition Banana Supply: पोषण आहारात केळीचा पुरवठा अल्पच

SCROLL FOR NEXT