Banana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळीच्या आवकेत मोठी घट

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील आठवड्यात केळीच्या आवकेत मोठी घट झाली आहे. परंतु दर अस्थिर असून, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमधील व्यापारी लॉबी ऐन सणासुदीच्या कालावधीत दर पाडत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. खानदेशात दर्जेदार केळी काढणीवर आहे. मध्य प्रदेशात मात्र जुनारी बागा, पिलबाग केळीमधून केळीची आवक बाजार समितीत होत असून, तेथे केळीचे लिलाव होत आहेत. कमी दर्जाची केळी तेथे अधिक येत आहे. तेथे केळी दरात मागील पाच ते सहा दिवसांत सतत घट झाली आहे.

आवकेत तेथे घट होऊनही दरात घट झाल्याचा प्रकार घडला आहे. तेथे किमान दर ११०० रुपये तर कमाल दर १९७५ रुपये प्रतिक्विंटल असे रविवारी (ता. २०) होते. केळीची आवक तेथे ७० गाड्या (एक वाहन दोन ते १० टन क्षमता) एवढी आहे. तेथे सात ते आठ दिवसांपूर्वी प्रतिदिन सरासरी १२० गाड्या केळीची आवक झाली होती.

दुसरीकडे खानदेशात बऱ्हाणपूरमधील दरांनुसार केळीची खरेदी केली जात असून, तेथील दरांबाबतच्या घडामोडींचे दाखले देऊन खानदेशातही खरेदीदार कमी दरात केळीची खरेदी करीत आहेत. यामुळे रावेर, चोपडा येथे केळीचे लिलाव करून दर जाहीर करावेत व त्यानुसार केळीची शिवार खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

खानदेशातही केळीची आवक घटली आहे. कारण कांदेबाग केळीमधील काढणी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. आता उशिराचे कांदेबाग, नवती केळीमधून केळीची काढणी सुरू होईल. या केळीचे दर किमान २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे असावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. कारण खर्च वाढला आहे. खानदेशात केळीची आवक सध्या प्रतिदिन ४५ ते ५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Vs Canada : जुन्या वादाला नव्याने फोडणी

POCRA Scheme : ‘पोकरा -२’मध्ये हवी पारदर्शकता

ST Fare Hike Issue : एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द; ५५ कोटींची सरकारकडे मागणी

Maharashtra Vidhansabha Election 2024 : सिंधुदुर्ग बागायतदार संघ लढविणार सावंतवाडीतून विधानसभा निवडणूक

Goat Market : तळेगाव ढमढेरे येथील बाजारात १८०० शेळी, मेंढ्यांची विक्री

SCROLL FOR NEXT