Banana Rate : खानदेशात केळीची कमी दरात खरेदी

Banana Market : खानदेशात कांदेबाग केळी बागांची काढणी सुरू आहे. परंतु प्रचलित दरांच्या तुलनेत २०० ते ५०० रुपये कमी दरात केळी खरेदीचा प्रकार सर्वत्र सुरू आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कांदेबाग केळी बागांची काढणी सुरू आहे. परंतु प्रचलित दरांच्या तुलनेत २०० ते ५०० रुपये कमी दरात केळी खरेदीचा प्रकार सर्वत्र सुरू आहे. कमी मागणी, अधिक आवक आदी समस्या सांगून खरेदीदारांनी दर पाडण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या केळीची अधिक आवक यावल, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव, जामनेर भागांत सुरू आहे. परंतु कमी दर्जाच्या केळीचे कारण सांगून केळीची खरेदी प्रचलित दरांपेक्षा ५०० ते २०० रुपये कमी दरात केली जात आहे. कमी दरात खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

Banana Market
Banana Rate : खानदेशात केळी दरात घट सुरूच

खरेदीदार शेतकऱ्यांना केळीच्या काढणीचे आश्‍वासन देत आहेत. परंतु चार ते पाच दिवस उशिरा काढणी करतात. तोपर्यंत काढणीयोग्य केळी झाडांची अधिक वजन व अन्य समस्यांनी पडझड होते. आणखी नुकसान होईल, या भीतीने शेतकरी कमी दरात काढणीला तयार होतात. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Banana Market
Banana Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत केळी विमाधारकांवर अन्याय

सध्या केळीचे दर कमाल २३०० रुपये प्रतिक्विंटल एवढे जाहीर होत आहेत. परंतु केळीची काढणी १५०० ते १७००, १९००, २००० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांची नवती केळी काढणीवर आहे, या भागातही कमी दरात केळीची खरेदी करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे जे दर जाहीर होत आहेत, त्यातच खरेदीची सक्ती व्यापारी, खरेदीदारांना करावी, अशी मागणी शेतकरीकरीत आहेत.

केळीचे दर रावेर येथील बाजार समिती रोज जाहीर करीत आहे. परंतु जे दर होतात, त्यात खरेदी केली जाते की नाही, हा मुद्दा आहे. केळीची ९८ टक्के खरेदी थेट शेतात किंवा शिवार खरेदी केली जाते. या खरेदीवर बाजार समिती, प्रशासन किंवा जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक कार्यालयाचे नियंत्रण कुठेही नाही. हे नियंत्रण नसल्याने खरेदीदार मनमानी करीत आहेत.

केळी नाशिवंत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी करून कमी दरात खरेदीचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. केळी खरेदीदारांची नोंदणी, परवाने याची देखील तपासणी कुठे केली जात नाही, असा आरोप खानदेशातील शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com