Tomato Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Price Crash : टोमॅटोच्या भावात एकाच महिन्यात मोठी घसरण; उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी अडचणीत

Market Update : बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे. दीड ते दोन महिन्यापुर्वी बाजार समित्यांमध्ये ४ हजार ते ५ हजाराने विकलेला टोमॅटो आता ७०० ते १२०० रुपयाने विकावा लागत आहे.

Anil Jadhao 

Pune News : बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याने दरात मोठी घट झाली आहे. दीड ते दोन महिन्यापुर्वी बाजार समित्यांमध्ये ४ हजार ते ५ हजाराने विकलेला टोमॅटो आता ७०० ते १२०० रुपयाने विकावा लागत आहे. बाजारात एकाच महिन्यात झालेल्या पडझडीने शेतकरी मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. 

देशभरातील बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. आवक वाढल्यानंतर दरात घट झाली आहे. टोमॅटोचे भाव मागील दोन महिन्यांमध्येच जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाले आहेत. बाजारात आवक वाढली पण उठाव मात्र स्थिर आहे. याचा दबाव टोमॅटोच्या भावावर दिसून आला. सध्या महत्वाच्या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये नवा माल बाजारात येत आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. हा टोमॅटो देशभरातील बाजारात पाठवला जात आहे. त्यामुळे सर्व बाजारांमध्ये आवक जास्त दिसत आहे. 


यंदा पाऊसमान चांगले होते. त्यातच लागवडीसाठी पोषक हवामान राहीले. त्यामुळे लागवडी चांगल्या झाल्या. तसेच पिकासाठी पोषक हवामान राहील्याने उत्पादनही चांगले राहीले. हा माल आता बाजारात येत आहे. राज्याच्याही इतर भागात टोमॅटोची आवक सुरु वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे. त्यामुळे टोमॅटोला मिळणारा बाजारभाव खूपच कमी झाला. 

बाजारातील टोमॅटोची आवक नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपासूनच वाढायला सुरुवात झाली होती. त्यानंतर बाजार हळूहळू कमी होत गेला. नोव्हेंबर महिन्यात टोमॅटोचा भाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होता. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलला या दरम्यानच भाव होते. पण बाजारात जशी आवक वाढत गेली तसे दरातही घट होत गेली. किरकोळ बाजारात टोमॅटो ७० ते ८० रुपयाने विकला जात होता. तो आता २० ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. 

भाव उत्पादन खर्चापेक्षाही खाली

बाजारातील आवक वाढल्याने एकाच महिन्यात भावात निम्म्याने घट झाली. लागवडी एकाच वेळी तोडणीला आल्याने बाजारात पुरवठा वाढला. आज अनेक बाजारात टोमॅटोचा सरासरी भाव ५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. तर सरासरी भावपातळी ७०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. टोमॅटोचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT